स्त्री शक्ती प्रबोधन (शहरी) - संवादिनी
उपक्रम :
मासिक बैठक
या बैठकांमधून विविध विषयांवर तज्ज्ञांचे मार्गदर्शन मिळते,स्वतःच्या विचाराबद्दल स्पष्टता,विचारांची देवाणघेवाण, जाणीव जागृती,जाणीव व्यापकता साध्य होते. नवीन येणाऱ्या मैत्रिणींशी सुसंवाद साधतानाच सदस्यांची स्वजाणीव आणि आत्मविश्वास यात लक्षणीय बदल होतो.
🔹संवादिनीचे मुख्य प्रवेशद्वार व पायाभूत उपक्रम
🔹उद्देश – एकत्र येणे व संघटन मजबूत करणे
🔹दर महिन्याला विषयाधारित बैठक (व्यक्तिमत्त्व विकास, आरोग्य, सामाजिक बांधिलकी,व्यावहारिक कौशल्य)
🔹व्याख्याने, गटचर्चा, कार्यशाळा, संस्थाभेट
🔹ऑफलाईन व ऑनलाईन दोन्ही स्वरूप
🔹इच्छुक पुरुषांसाठीही खुले
समतोल
🔹सातत्याने २५ वर्षांहून अधिक काळ प्रकाशित होणारे.
🔹दिवाळी अंकासह विविध सूत्रविषय असलेल्या सहा अंकांचे वर्षभरात प्रकाशन होते. यामध्ये प्रतिथयश, नवीन लेखकांबरोबर संवादिनी सदस्यांनाही अभिव्यक्तीची संधी दिली जाते.
🔹समाजातील विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या हस्ते दिवाळी अंकांचे प्रकाशन केले जाते.विचारांना चालना देणारे साहित्य असलेल्या ह्या अंकाच्या निवडीपासून ते वितरणापर्यंतची सर्व जबाबदारी संवादिनी सदस्या स्वयंसेवी वृत्तीने घेतात.
🔹समतोलच्या कामावर अनेक राज्यस्तरीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कारांच्या रूपाने यशाची मोहोर उमटली आहे.
उमलत्या वयाशी जुळवून घेताना आणि इतर
🔹पौगंडावस्थेतील मुलांना त्यांच्यामध्ये घडणाऱ्या शारीरिक व मानसिक बदलांबाबत विज्ञाननिष्ठ माहिती मिळणे गरजेचे आहे हे सर्वमान्य आहे.
🔹शालेय शिक्षणात लैंगिक विकासाच्या योग्य व तंत्रशुद्ध शिक्षणाचा अभाव आहे.यासंबंधी असलेली भीती आणि सामाजिक दडपणामुळे मुलांना योग्य पद्धतीने कुतूहल शमनाची संधी मिळत नाही.
🔹अनेक प्रकारच्या अवाजवी व अशास्त्रीय माहितीचा भडिमार त्यामुळे मुलांची अवस्था गोंधळलेली असते.वयात येण्याऱ्या व तरुणाईच्या टप्प्यांवरही मुलांना त्यांच्यामधील बौद्धिक, भावनिक व सामाजिक जबाबदारीची जाणीव करुन देणे.त्यांच्यामध्ये निर्माण होणारी ‘स्व’ची जाणीव,स्वप्नातून वास्तवाकडे अलगद नेणे गरजेचे आहे.
🔹त्याच बरोबर स्त्री-पुरुष दोघांनीही परस्परांविषयी आदरभाव व माणुसकीचा दृष्टिकोन जपणे गरजेचे आहे.
🔹यासाठी उमलत्या वयाची जुळवून घेताना या गटातर्फे लैंगिकता व लिंग समभाव प्रशिक्षण कार्यशाळा आयोजित केल्या जातात यासाठी गटाने दहा विषयांवरील प्रशिक्षण हस्तपुस्तिका संच तयार केला आहे.
ओळख स्पर्शाची
ओळख स्पर्शाची ३६०°
🔹लहान मुलांचे भावविश्व सुरक्षित आनंदी राहावे, तसेच त्यांना निर्भय लहानपण मिळावे.
🔹पहिली ते आठवीच्या वयोगटातील मुलांसाठी व त्यांच्या संपर्कात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीपर्यंत चांगल्या – वाईट स्पर्शाची ओळख आणि या विषयाची जागरूकता निर्माण करण्यासाठी हा उपक्रम आहे.
🔹या कार्यशाळेत विविध गोष्टी, कृतिखेळ, पुस्तिका, दृकश्राव्य माध्यमाचा वापर केला जातो.
🔹मुलांच्या आणि पालकांच्या मार्गदर्शनासाठी ज्ञान प्रबोधिनी प्रज्ञा मानस संशोधिका यांच्या साहाय्याने ‘बाल संवाद कट्टा’ ही मोफत सेवा उपलब्ध झालेली आहे.
🔹संपर्क:- बाल संवाद कट्टा : ९२२६०७४७६७
विद्याव्रत संस्कार
🔹विद्याव्रत संस्कार हा एक शैक्षणिक संस्कार असून प्रबोधिनी बाहेरील सर्व सामाजिक गटांतील विद्यार्थी-विद्यार्थिनींसाठी संवादिनी गटातर्फे २०११ पासून सुरू आहे. शहरी, निमशहरी,वस्तीविभाग,ग्रामीण भाग, अशा विविध ठिकाणच्या शाळांमध्ये सत्रे घेतली जातात. व्यक्तिमत्व विकसनाला पूरक अशा प्रस्तावना, शारीरिक विकसन, मानसिक विकसन, बौद्धिक विकसन , सामाजिक विकसन आणि व्रतोपासना या सहा विषयांवर परस्पर संवादात्मक सत्रांचे आयोजन केले जाते.
🔹कृतिखेळ, रोल प्ले, वादविवाद, बौद्धिक खेळ, गोष्ट, प्रसंग, अनुभवकथन, चार्ट्स इ. च्या साहाय्याने विषय मांडणी केली जाते.
🔹दरवर्षी मे महिन्यात व्रतोत्सुक विद्यार्थी-विद्यार्थिनींसाठी प्रबोधिनीमध्ये आठ दिवसांचे शिबिर घेतले जाते.
🔹२०१८ पासून विद्याव्रतींसाठी वर्षभर अनुभव शिक्षणात्मक जोपासना सत्रे घेतली जात आहेत.
पालवी
उपेक्षित गटातील विद्यार्थ्यांमध्ये अभ्यासाची आवड निर्माण व्हावी म्हणून अभ्यासपूरक कृती कार्यक्रम घेतले जातात. मुलांच्या प्रतिसादाकडे जाणीवपूर्वक लक्ष दिले जाते.
🔹 उपेक्षित गटातील विद्यार्थ्यांसाठी उपक्रम
🔹वयोगट: ५वी–७वी
🔹वाचन, लेखन, आकलन व स्मरण कौशल्य विकास
🔹कृतीखेळ, गोष्टी व आनंददायी शिक्षण पद्धती
विकासिका गट
विद्यार्थ्यांमध्ये स्वभान व सामाजिक भान वाढविणे हा गटाचा उद्देश आहे.
सामर्थ्य सवयींचे, निर्णय कौशल्य, निरीक्षण कौशल्य, रंग भावनांचे, सुरक्षा असे विषय कृती खेळ, प्रसंग, अनुभव या माध्यमांच्या मदतीने मुलांपर्यंत पोहोचवले जातात.
मुलांमध्ये देशप्रेम आणि आदर वाढावा म्हणून शालेय प्रतिज्ञेचा अर्थ इतिहासातील गोष्टी उदाहरणे,सद्यस्थितीतील प्रसंग,काही व्यक्ती, त्यांचे अनुभव अश्या पध्दतीने विविध शाळांमध्ये गावांमध्ये हा अर्थ पोचवला जातो.
तसेच संविधानाचे महत्त्व मुलांना कळावे व त्यांच्यात ते रुजावे म्हणून उदाहरणे, कृती खेळ काही प्रसंग व अनुभव यांच्यातून त्याचाही अर्थ शाळांमध्ये व गावांमध्ये पोचवला जातो.
विनोबा भावे लिखित ‘सप्तशक्ती’ या विषयाचे तसेच अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवनपटात आढळलेल्या याच सप्तशक्तींचे संवादरूपी सादरीकरण गटसदस्या वेगवेगळ्या ठिकाणी सादर करत असतात.
प्रसंगानुरुप काही विषयांचा व्यक्तींचा अभ्यास व त्याचे संकलन हा गट करत असतो.
किशोर किशोरी जीवन कौशल्य
🔹१२ ते १६ वयोगटातील मुलामुलींमध्ये जीवन कौशल्य (Life skills) रुजवणे हा या गटाचा उद्देश आहे.
🔹 ही कौशल्ये मुलांचे व्यक्तिमत्त्व समृद्ध करतात. ही कौशल्ये आत्मसात केल्याने मुलांमध्ये सकारात्मक बदल होतो.
🔹 मुलांमध्ये स्व-जाणीव निर्माण करणे व या कौशल्यांची ओळख करून देणे आणि मुलांमध्ये ती रुजवणे हे किशोर वयातच आवश्यक आहे त्यासाठी मुलांच्या पालकांशी व शिक्षकांशीदेखील संवाद साधला जातो.
🔹या उपक्रमात अभ्यासाची पूर्वतयारी, स्व-जाणीव स्वीकार ,संवाद, प्रश्र, निरीक्षण, निर्णय, विचार याविषयांमधील कौशल्ये यांबरोबरच स्वयंशिस्त- ध्येय निश्चिती, वेळेचं नियोजन, दिल-दोस्ती, भावनांची ओळख-नियमन, गटकार्य-सहकार्य असे विषय समाविष्ट आहेत. कृतीखेळ, गटचर्चा, रोलेप्लेच्या माध्यमांद्वारे मुलांना मार्गदर्शन केले जाते.
🔹गटातर्फे प्रशिक्षक प्रशिक्षण कार्यशाळा आयोजित केल्या जातात, त्यासाठी गटाने विषयांची पुस्तिका तयार केली आहे.
मनोवेध गट
🔹स्त्रियांमध्ये स्वतःच्या मानसिक स्वास्थ्याविषयी अनास्था दिसते. त्याविषयी यथायोग्य माहिती नसते.
🔹विविध भावनांची आंदोलने, ताणतणाव, कौटुंबिक अडचणी, वैवाहिक समस्या, पिढीपिढीतील मतभेद अशा अनेक गोष्टींचा परिणाम स्त्रियांच्या मानसिक स्वास्थ्यावर होत असतो
🔹या बदलांकडे जाणीवपूर्वक पाहण्यासाठी आणि वस्तुनिष्ठ विचार मोकळेपणाने करण्यासाठी ‘मनोवेध’ हा उपक्रम काम करीत आहे.
🔹स्त्रियांनी स्वतःचे स्वास्थ्य जाणून घेऊन त्यावर यथायोग्य उपाय शोधण्यास आम्ही मदत करतो.
🔹रोल प्ले आणि संवादाच्या माध्यमातून परिचय सत्र (orientation) घेतले जाते. त्यानंतर चर्चा आणि प्रश्न उत्तरे घेतली जातात.
🔹गरज पडत असेल तर समुपदेशन घेण्याविषयी जागृती केली जाते.
🔹कार्यशाळे मध्ये स्व ओळख, विचार, भावना, वर्तन साक्षरता आणि मानसिक आरोग्य सुदृढ करण्यासाठी आपली कशी आणि काय जबाबदारी आहे, त्यावर कसे काम करायचे हे सांगितले जाते. रोल प्ले,केस स्टडी आणि चर्चेतून मार्गदर्शन केले जाते.
🔹मनोवेध या उपक्रमामुळे स्त्रियांविषयी अत्यंत जिव्हाळ्याच्या विषयापर्यंत पोहोचता येते.
स्त्री पुरुष संपूरकता
🔹आजच्या काळामध्ये कुटुंब व्यवस्थेत विधायक बदल होणे आवश्यक आहेत. यासाठी स्त्री-पुरुषां मधील नात्यांमध्ये पूरकता ही संकल्पना लहान वयापासून रुजली तर कुटुंबामध्ये नातेसंबंध सुदृढ राहतील.
🔹श्रम प्रतिष्ठा, स्वावलंबन, संवेदनशीलता व सौजन्यशीलता या चार मूल्यांची जोपासना व्यक्तींमध्ये होण्यासाठी त्याची आवश्यकता अधोरेखित करणे.
🔹समाजामध्ये झपाट्याने होणारे अनुकूल- प्रतिकूल बदल, त्याचा व्यक्ती जीवनावर व कुटुंबावर होणारा परिणाम, स्वातंत्र्याच्या बदललेल्या कल्पना तंत्रज्ञानाचा अतिरेकी वापर व नातेसंबंध या विषयावर चर्चात्मक सत्र
🔹जुने – नवे याची योग्य सांगड घालत कुटुंब व्यवस्था, व्यक्ती व्यक्तींमध्यील नाते यांचा समतोल साधणे.