सर्वसाधारण प्रबोधिनीपण

७ कालच्यापेक्षा आज पुढे गेलेच पाहिजे

आपल्याला माशासारखे पोहता यावे, पक्ष्यासारखे उडता यावे, गरुडासारखी झेप घेता यावी, चित्त्यासारखी झडप घालता यावी, वाघासारखी झुंज घेता यावी असे इतिहास पूर्वकाळापासून माणसाला वाटत आले आहे. या वाटण्यामुळेच अनेक जण तसे करण्याचा प्रयत्न करत राहिले. पाणबुडी, विमान, रॉकेट यांसारख्या यंत्रांचे शोध आणि ॲथलेटिक्स, मल्लयुद्ध यांसारखे क्रीडा प्रकार यांचा शोध त्यातूनच लागला. अनेक पशु-पक्ष्यांच्या हालचाली पाहून […]

७ कालच्यापेक्षा आज पुढे गेलेच पाहिजे Read More »

६ चार पायाभूत लक्षणे

‌‘सर्वसाधारण प्रबोधिनीपण‌’ या पुस्तिकेतील पहिला लेख लिहिला तेव्हा, प्रत्येक गुणासाठी कोणत्या प्रकारचा आग्रह आहे, हे लक्षात यावे म्हणून, काही विधाने नकारात्मक भाषेत ‌‘नाही‌’चा वापर करून लिहिली होती, तर काही विधाने सकारात्मक भाषेत ‌‘च‌’चा वापर करून लिहिली होती. या गुणांचीच पुढे बारा वर्षांनी पायाभूत व प्रगत गुण अशी विभागणी केलेली आहे. पायाभूत गुण (शालेय विद्यार्थ्यांसाठी) :1)

६ चार पायाभूत लक्षणे Read More »

५ रोज उपासना झालीच पाहिजे

‌‘पिक्सेल‌’ची संख्या वाढवा आपल्या घरातील दूरदर्शन संचाच्या काचेच्या पडद्याला, आतल्या बाजूने रसायनांच्या मिश्रणाचा एक मुलामा दिलेला असतो. संचाच्या आतून संपूर्ण पडद्यावरील या रसायनांच्या मुलाम्यावर, विद्युत्‌‍-कणांचा मारा होतो. ते विद्युत्‌‍-कण या मुलाम्यावर आदळल्यावर त्यांच्या उर्जेचे प्रकाशात रूपांतर होते. त्यामुळे संपूर्ण पडदा आतून प्रकाशित होतो व बाहेरून पडदाभर चित्र बघायला मिळते. या पडद्यावरचे चित्र किती स्पष्ट आणि

५ रोज उपासना झालीच पाहिजे Read More »

४ प्रत्येक कामात इतरांच्या हिताचा विचार

सृजनात्मक आणि आव्हानात्मक काम कोणतेही नवीन किंवा मोठे काम करताना, ते नवीन आहे किंवा मोठे आहे, हे आव्हान किंवा त्याचा आनंद, काम करणाऱ्याला प्रेरणा देत असतो. नवीन रेल्वे मार्ग उभारणे, नवीन आठ पदरी महामार्ग बांधणे, वेगवान प्रवाहाच्या नदीवर पूल बांधणे, समुद्रतळाखालून बोगदा खणणे, दोनशे मजली इमारत बांधणे, प्रचंड धरणे बांधून कालव्याद्वारे त्यातील पाणी शेकडो किलोमीटर

४ प्रत्येक कामात इतरांच्या हिताचा विचार Read More »

३. गुणवत्तेत तडजोड नाही

दूरदृष्टीचे नियोजन रविवार दि. 25 फेब्रुवारी 2007 रोजी युवकांची क्रीडा-प्रात्यक्षिके पुण्यामध्ये झाली. प्रात्यक्षिके विद्युत्‌‍-प्रकाशात झाली. वीज-पुरवठा खंडित झाला तर अडचण होऊ नये म्हणून सर्व वेळ जनित्राचा वापर केला होता. योगायोगाने प्रात्यक्षिके चालू असतानाच्या काळात पश्चिम महाराष्ट्रातील बऱ्याच भागातील वीज गेली होती. प्रात्यक्षिके पाहणाऱ्यांना मात्र बाहेर सर्वत्र अंधार आहे याची काहीच कल्पना नव्हती. एका जनित्राने केवढी

३. गुणवत्तेत तडजोड नाही Read More »

२. विनाश्रमाचे घेणार नाही

चार प्रकारचे सदस्य प्रबोधिनीमध्ये संगणक प्रणालीकार (कॉम्प्युटर प्रोग्रॅमर) एवढे एकच काम करणारे अजून तरी कोणी नाही. पण अनेक विभागांमध्ये गरजेनुसार संगणक प्रणाली तयार करून घ्यावी लागते. कल्पना करूया की अशांची नेहमीसाठी गरज निर्माण झाली व अनेक जण त्या प्रकारचे काम करू लागले. कोणतेही काम करणारे पुरेशा संख्येने आले की प्रबोधिनीत त्यांचे काम करण्याचे चार प्रकार

२. विनाश्रमाचे घेणार नाही Read More »

१. सर्वसाधारण प्रबोधिनीपणाची लक्षणे

कृतीने व्यक्तीची ओळख पटते इंग्रजांचे राज्य हिंदुस्थानात नुकतेच सुरू झाले होते तेव्हाची गोष्ट आहे. लष्करातल्या काही इंग्रज अधिकाऱ्यांना भारतीयांची वेदविद्या जाणून घ्यावी अशी इच्छा झाली. त्यासाठी संस्कृत शिकायला पाहिजे. नेहमीच्या पोशाखात गेलं तर कोणीही पंडित आपल्याला त्यांची देववाणी संस्कृत शिकवणार नाही याची त्यांना खात्री होती. त्यामुळे त्यांनी केस कापून घेऊन मुंडण केले, गळ्यात जानवे घातले,

१. सर्वसाधारण प्रबोधिनीपणाची लक्षणे Read More »

सर्वसाधारण प्रबोधिनीपण – दुसऱ्या आवृत्तीची प्रस्तावना

आठ वर्षांपूव सर्वसाधारण प्रबोधिनीपण या पुस्तिकेची पहिली आवृत्ती काढली होती. प्रबोधिनीचे विद्याथ, सदस्य व कार्यकर्ते या सर्वांनाच सोप्या भाषेत मांडलेले प्रबोधिनीपणाचे गुण उपयुक्त वाटले.या पुस्तिकेतला पहिला लेख 1995 मध्ये लिहिलेला आहे. पुढचे पाच लेख 2007 मध्ये लिहिलेले आहेत. शेवटच्या लेखाचा समावेश या पुस्तिकेत नव्यानेच केला आहे. तो 2009 मध्ये लिहिलेला आहे. नवीन आवृत्ती काढताना तीन

सर्वसाधारण प्रबोधिनीपण – दुसऱ्या आवृत्तीची प्रस्तावना Read More »