वैचारिक

७. मन एकाग्र केल्याने सर्व प्रकारचे ज्ञान मिळते.

७. मन एकाग्र केल्याने सर्व प्रकारचे ज्ञान मिळते. ‘अविद्यया मृत्युं तीर्त्वा –‌’ भौतिक ज्ञानाने भौतिक जगात यशस्वी होऊन ‌‘– विद्यया अमृतम्‌‍ अश्नुते‌’, अध्यात्मज्ञानाने अमृतत्वाचा अनुभव येतो, हे प्रबोधिनीचे बोधवाक्य आहे. भौतिक ज्ञान मिळवून कर्मवीर भौतिक जगात यशस्वी होतो. कर्मयोग्याला शेवटी अध्यात्मज्ञान मिळते व तो अमृतत्वाचा अनुभव घेतो. अर्जुन कर्मवीर होताच. त्यामुळे कर्मवीर होण्यासाठी काय करायचे […]

७. मन एकाग्र केल्याने सर्व प्रकारचे ज्ञान मिळते. Read More »

६.सर्वात दुर्बळ दुव्यापाशी साखळी तोडा

६.सर्वात दुर्बळ दुव्यापाशी साखळी तोडा दोन छान बोधप्रद गोष्टी आहेत. पहिल्या गोष्टीत एका राजाचे डोळे खूप दुखायला लागतात. त्यांची आग-आग होत असते. वैद्य येतो, डोळे तपासून निदान करतो. खूप रखरखीत, उन्हाचे वातावरण बरेच दिवस आहे. त्यामुळे डोळे कोरडे पडले आहेत. उपाय म्हणजे राजाने भरपूर हिरवाई पाहावी असे वैद्य सांगतो. राजाने लगेच सर्व भिंती, वस्तू, कपडे,

६.सर्वात दुर्बळ दुव्यापाशी साखळी तोडा Read More »

५. उद्दिष्टाकडे जाण्यातला अडथळा आहे ‘काम’

५. उद्दिष्टाकडे जाण्यातला अडथळा आहे ‌‘काम‌’ खेळांच्या किंवा कसरतींच्या विविध प्रकारांपैकी एक प्रकार आहे, गोल कड्यामधून उडी मारण्याचा. शरीर मधल्या जागेतून आरपार जाऊ शकेल एवढे मोठे गोल कडे असते. ते जमिनीपासून थोडे वर उचलून उभे धरलेले असते. पुरेशा वेगाने येऊन नेम धरून उडी मारली तर पलीकडे जाणे थोड्या सरावाने जमू शकते. पळत येऊन कड्यामधून सूर

५. उद्दिष्टाकडे जाण्यातला अडथळा आहे ‘काम’ Read More »

४ हाव आणि राग हेच आपले खरे शत्रू

४ हाव आणि राग हेच आपले खरे शत्रू स्वतःचा उद्धार करण्यासाठी स्वतःजवळ शक्ती हवी. त्याच बरोबर पुढे जाण्यासाठी पायाखाली भक्कम आधार हवा. स्वतःची प्रगती करणे हेच उद्दिष्ट असेल, त्यासाठी युक्ताहारविहाराचे नियम नियमित व्यवस्थित पाळायचे असतील, तर उद्दिष्टावरून लक्ष ढळून चालणार नाही. आपले लक्ष उद्दिष्टावर स्थिर ठेवायला ज्या गोष्टी मदत करतात त्या म्हणजे आधीच्या श्लोकातील युक्ताहारविहार.

४ हाव आणि राग हेच आपले खरे शत्रू Read More »

३.शक्तिसंग्रहासाठी स्वयं-अनुशासन

३.शक्तिसंग्रहासाठी स्वयं-अनुशासन पहिले दोन श्लोक प्रौढांना जेवढे मार्गदर्शक तेवढेच ते युवक-युवती आणि किशोर-किशोरींनाही मार्गदर्शक आहेत. त्या मार्गाने जायचे तर सुरुवात कुठून करायची हे या तिसऱ्या श्लोकात सांगितले आहे. किशोर-किशोरींसाठी आपण विद्याव्रत संस्कार योजतो. त्याच्यासाठी रचलेल्या पोथीतील हा श्लोक आहे. (विद्याव्रत उपासना पोथी, चौथी आवृत्ती, २०१७, पान १७) स्वतः स्वतःचा उद्धार करायचा, आहोत त्या स्थितीतून स्वतःला

३.शक्तिसंग्रहासाठी स्वयं-अनुशासन Read More »

२. स्वतःच्या मर्यादा सतत ओलांडणे म्हणजे स्वतःचा उद्धार

प्रबोधिनीत एक पद्य म्हटले जाते. त्याचे शेवटचे कडवे आहे – ‌ ‘मर्यादांनी मर्यादुन? छे ! त्यांना उल्लंघुनी पुढे पुढे चालणे असू दे हेच ध्येय तव मनी ॥‌’ हे पद्य लिहिले गेले त्याच सुमारास प्रबोधिनीच्या उद्योगांमध्ये खंडेनवमीच्या यंत्रपूजनाच्या उपासनेची पोथी तयार झाली. त्या उपासनेमध्ये उपासनेचे सूत्रचालक किंवा अध्वर्यू असे म्हणतात की ‌‘सीमोल्लंघन म्हणजे दसऱ्याच्या दिवशी आपल्या

२. स्वतःच्या मर्यादा सतत ओलांडणे म्हणजे स्वतःचा उद्धार Read More »

१.भीरुता तुम्हाला शोभत नाही. कडवे, शूर व्हा.

स्वामी विवेकानंदांनी एकदा बेलुर मठामधल्या तरुण ब्रह्मचारी व संन्याशांना भगवद्गीता शिकवायचे ठरवले. गीतेचे रचनाकार व भाष्यकार यांची माहिती सांगत सांगत त्यांनी गीतेच्या दुसऱ्या अध्यायावर बोलायला सुरुवात केली. पहिल्या दोन श्लोकांचा साधा शब्दार्थ सांगून तिसऱ्या श्लोकावर ते बोलू लागले. त्याचा अर्थ विस्ताराने स्पष्ट करून ते म्हणाले की संपूर्ण गीता वाचल्याचे पुण्य हा एक श्लोक वाचल्याने मिळते.

१.भीरुता तुम्हाला शोभत नाही. कडवे, शूर व्हा. Read More »

गीतेतील चार सूत्रे

मला सर्वप्रथम गीतेतील कर्मयोगच भावला. त्यामुळे पहिल्या वीस वर्षांच्या अभ्यासानंतर गीतेचे सार मी चार छोट्या वाक्यांमध्ये काढले. पहिले – संकल्पेषु यज्ञत्वम्‌‍. जेवढे इतरांकडून घेतले किंवा मिळाले, त्यापेक्षा जास्त इतरांना देण्याचा विचार आपल्या संकल्पातच असावा. दुसरे सूत्र गीतेतलेच कर्मसु कौशलं हे ठरले. कोणतेही काम करताना त्या कामात जास्तीत जास्त कुशलता आणण्याचा प्रयत्न केला पाहिजे. तिसरे सूत्र

गीतेतील चार सूत्रे Read More »

प्रस्तावना

स्वातंत्र्यपूर्व काळात लोकमान्य टिळक, महात्मा गांधी, डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन्‌‍, योगी अरविंद अशा थोर नेत्यांनी गीतेच्या अर्थाचे विवरण आपापल्या विचारानुसार केले. त्यामध्ये स्वातंत्र्याच्या प्रयत्नांसाठी समाजाला जागृत करणे हा सर्वांचा एकच हेतू होता. गीतेचा संदेश सांगून स्वातंत्र्य चळवळीला प्रवृत्त करणे हा जागृतीचा एक प्रकार होता. स्वातंत्र्य मिळवून देशातल्या व्यक्तीने कोणत्या ध्येयासाठी जगावे या विचाराला प्रवृत्त करणे हा

प्रस्तावना Read More »

उपासना सूक्ते

प्रस्तावना             ‌‘उपासना सूक्ते‌’ या पुस्तिकेत ज्ञान प्रबोधिनीचे आद्य संचालक कै. आप्पांचे उपासनेविषयीचे विचार चोवीस सूक्तांच्या रूपात संकलित केले आहेत. यातील एका सूक्तामध्ये कौटुंबिक उपासनेचा उल्लेख येतो. चार सूक्तांमध्ये सामूहिक उपासनेचा उल्लेख आहे. तर इतर सर्व सूक्ते व्यक्तिगत उपासना का व कशी करावी यासंबंधी आहेत. तर, या संकलनातील शेवटचे सूक्त म्हणजे कै. आप्पांनी सामूहिक उपासनेसंबंधी

उपासना सूक्ते Read More »