वैचारिक

१७. करू आम्ही सर्वस्व समर्पण

१७. करू आम्ही सर्वस्व समर्पण महापुरुषपूजेच्या वेळी कै. आप्पांनी गायलेला गीतेतला पुढचा श्लोक भक्तांची लक्षणेच सांगणारा होता (ज्ञान प्रबोधिनी : एक अभिनव शैक्षणिक प्रयोग, खंड२, पान ३१०) – गीता १२.१४ :        संतुष्टः सततं योगी यतात्मा दृढनिश्चयः |                            मय्यर्पितमनोबुद्धिः यो मद्भक्तः स मे प्रियः ॥ गीताई १२.१४ :      सदा संतुष्ट जो योगी संयमी दृढनिश्चयी […]

१७. करू आम्ही सर्वस्व समर्पण Read More »

१६.विकसित व्यक्तिमत्त्वाच्या वाटेवरचे भावनिक गुण

१६.विकसित व्यक्तिमत्त्वाच्या वाटेवरचे भावनिक गुण प्रबोधिनीत स्वामी विवेकानंदांच्या भाषणातील पुढील उतारा पूव विद्यार्थ्यांना पाठांतराला दिला जायचा. “जे सुकुमार आहे, शक्तिपूर्ण, आरोग्यपूर्ण आणि कुशाग्र बुद्धियुक्त आहे, तेच परमेश्वराजवळ जाते असे श्रुतिवचन आहे. म्हणून उठा! स्वतःचे भवितव्य ठरविण्याचा हाच क्षण आहे. जो पर्यंत तुम्हांमध्ये तारुण्याची तडफ आहे, जोपर्यंत तुम्ही थकले-भागलेले, फिकटलेले, गळालेले झालेला नाहीत, उलट तारुण्याच्या उत्साहाने

१६.विकसित व्यक्तिमत्त्वाच्या वाटेवरचे भावनिक गुण Read More »

१५. प्रयत्न करणारे अनेक, त्यातले ध्येय गाठणारे काही थोडे

१५. प्रयत्न करणारे अनेक, त्यातले ध्येय गाठणारे काही थोडे आम्ही गणित, इंग्रजी किंवा इतिहास शिकवत नाही तर भाषा आणि मानव्यविद्या, भौतिक आणि सामाजिक शास्त्रे, यांच्या अभ्यासातून देशप्रश्नांचा अभ्यास करायला शिकवतो, अशी प्रबोधिनीतील नित्यघोषणा आहे. हे प्रत्यक्षात कसे आणायचे याचा विचार केला तर, संत सावता माळी यांनी बागाईतीतून, संत गोरा कुंभार यांनी मडकी बनवता बनवता, संत

१५. प्रयत्न करणारे अनेक, त्यातले ध्येय गाठणारे काही थोडे Read More »

१४.काम आणि कामाची साधने यांनीच पूजा करणे उत्तम

१४.काम आणि कामाची साधने यांनीच पूजा करणे उत्तम परमेश्वराला पूजेसाठी काहीही श्रद्धापूर्वक वाहिले तरी चालते. श्रद्धापूर्वक हात जोडून नमस्कार केला तरी चालते. परमेश्वराच्या दृष्टीने श्रद्धा महत्त्वाची. काहीही दिले तरी चालते या सवलतीचा भक्त मानवाने गैरफायदा घ्यावा का? की त्याने श्रद्धेने आपल्या जवळचे सगळ्यात उत्तम आहे ते द्यावे? देताना श्रद्धेने द्यावे (श्रद्धया देयम्‌‍) आणि अश्रद्धेने देऊ

१४.काम आणि कामाची साधने यांनीच पूजा करणे उत्तम Read More »

१३.नमस्कारा ऐसे नाही सोपे

१३.नमस्कारा ऐसे नाही सोपे प्रत्येक जण त्याच्या श्रद्धेप्रमाणे घडलेला असतो. आपापल्या श्रद्धेप्रमाणे प्रत्येक जण आपले पूजनीय दैवत निवडतो. ज्याची त्याची त्याच्या दैवतावरची श्रद्धा परमेश्वर बळकट करतो. श्रद्धेने कोणत्याही देवाची पूजा कोणत्याही पद्धतीने केली तरी ती पूजा परमेश्वरालाच पोचते. एवढ्या सगळ्या गोष्टी आधीच्या तीन श्लोकांमध्ये पाहिल्या. ही समावेशक भक्ती करण्यासाठी मन मोठे करत जावे लागते. आज

१३.नमस्कारा ऐसे नाही सोपे Read More »

१२. ध्येय एक – मार्ग अनेक

१२. ध्येय एक – मार्ग अनेक अनेक वर्षे विवेकानंद जयंतीला प्रबोधिनीच्या युवक विभागातर्फे क्रीडा प्रात्यक्षिके व्हायची. एका वष प्रात्यक्षिकांनंतर बोलताना कै. आप्पांनी विनोबांचे एक सहकारी श्री. राधाकृष्ण बजाज यांच्या ‌‘भारत का धर्म‌’ या लेखाचा संदर्भ दिला होता. (ज्ञान प्रबोधिनीचे संस्थापक, वि. वि. पेंडसे, दुसरी आवृत्ती, पान ६८ ते ७०) त्या लेखात श्री. बजाज यांनी म्हटले

१२. ध्येय एक – मार्ग अनेक Read More »

११. आपापल्या श्रद्धेच्या बळावर एकाच सत्याकडे

११. आपापल्या श्रद्धेच्या बळावर एकाच सत्याकडे ज्ञान प्रबोधिनीच्या पंधराव्या वर्धापन दिनानिमित्त महापुरुषपूजा या नावाचा एक अभिनव कार्यक्रम करण्यात आला होता. या पूजेमध्ये सर्व धार्मिक संप्रदायांच्या धर्मग्रंथांची पूजा करण्यात आली. त्या ग्रंथांमधल्या काही प्रार्थना म्हणण्यात आल्या व रामदास, दयानंद, विवेकानंद आणि अरविंद या चार राष्ट्रपुरुषांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले. या महापुरुषपूजेचे वृत्त ज्ञान प्रबोधिनीच्या दुसऱ्या खंडात

११. आपापल्या श्रद्धेच्या बळावर एकाच सत्याकडे Read More »

१०. जो जशी श्रद्धा ठेवतो, तसा तो होतो.

 १०. जो जशी श्रद्धा ठेवतो, तसा तो होतो. लोक अनेक तऱ्हांनी वागत असतात. ते जसे वागतात तसे का वागतात हे शोधण्याचा प्रयत्न केला, तर त्यांच्या स्वभावाची ठेवण जशी आहे, तसे ते वागतात हे लक्षात येते. कोणाचा स्वतः धडपड करण्यावर भर असतो. कोणी सरकार करील म्हणून वाट पाहतात. कोणी देव देईल ते घ्यायचे म्हणून स्वस्थ बसतात.

१०. जो जशी श्रद्धा ठेवतो, तसा तो होतो. Read More »

९. आपले आग्रह नसण्यात भक्तीचे रहस्य आहे

९. आपले आग्रह नसण्यात भक्तीचे रहस्य उद्दिष्टाकडे जायला जी कृती मदत करते ती पुण्य. उद्दिष्टाच्या विरुद्ध दिशेने नेणारी कृती, ते पाप. पाप-पुण्याच्या अशा व्याख्या केल्या तर उद्दिष्ट कोणते? स्वतःच्या खऱ्या रूपाची ओळख होणे, आत्मसाक्षात्कार होणे हे उद्दिष्ट सुद्धा एका व्यक्तीपुरते मर्यादित आहे. समाजबांधवांची सुखदुःखे उत्कटतेने जाणवणे, त्यांना योग्य कृतीने प्रतिसाद देणे हे जर कर्मातले सर्वोच्च

९. आपले आग्रह नसण्यात भक्तीचे रहस्य आहे Read More »

८. कामातील गुणवत्तेच्या चढत्या-वाढत्या पायऱ्या

८. कामातील गुणवत्तेच्या चढत्या-वाढत्या पायऱ्या आजपर्यंत गीतेतील सात श्लोकांचे निरूपण पाहिले. वीरवृत्तीने सदैव कामाला सज्ज असणे हे त्यांपैकी पहिल्या श्लोकाचे तात्पर्य. स्वतःच स्वतःच्या प्रगतीची सूत्रे हातात घ्यायची असतात हे दुसऱ्या श्लोकाचे सार. सर्व क्रिया वेळच्या वेळी, योग्य प्रमाणात, योग्य रितीने केल्याने साध्य होणारा योग दुःख दूर करतो हे तिसऱ्या श्लोकात पाहिले. पुढच्या तीन श्लोकांमध्ये मिळून

८. कामातील गुणवत्तेच्या चढत्या-वाढत्या पायऱ्या Read More »