वैचारिक

४.उपासनेतून चित्तउल्हास

उपासनेतील तिसरी पायरी : चित्तउल्हास             चित्तविस्तार प्रयत्नपूर्वक करत गेलो तर तो आपल्या नियंत्रणात राहतो. असा चित्तविस्तार स्व-कष्टार्जित किंवा अभ्यासयुक्त असल्याने तो जास्त टिकाऊ असतो. पण असे प्रयत्न चालू केल्यावर माझ्या बाबतीत काही वेळा अकल्पितपणे, यदृच्छया, म्हणजे ज्याचे कारण सांगता येत नाही अशा स्थळी, अशा काळी, अशा रितीने काही काळापुरता चित्तविस्तार होऊन गेला. हा अनुभव […]

४.उपासनेतून चित्तउल्हास Read More »

 ३. उपासनेची तयारी  :  चित्तविस्तार

आपले चित्त कायम मी आणि माझे याच्या चिंतनात गुंतून पडत असते. त्याला विधायक व विजिगीषू विचार करायची प्रथम सवय लावायची आणि मग या विचारांची कक्षा हिंदुराष्ट्रापर्यंत नेऊन भिडवायची. यालाच चित्तविस्तार म्हणायचे. ‌‘परब्रह्मशक्ती स्फुरो हिंदुत्वामध्ये‌’ या शक्ति-मंत्राच्या मननानेच हा चित्तविस्तार होतो. प्रबोधिनी हिंदुस्थानव्यापी व्हावी अशा चिंतनाने, ‌‘परब्रह्मशक्ती स्फुरो प्रबोधिनीमध्ये‌’ या शक्ति-मंत्राच्या मननाने,  आपला चित्तविस्तार कृतीच्या भाषेत

 ३. उपासनेची तयारी  :  चित्तविस्तार Read More »

२ . उपासनेची तयारी  :  चित्तप्रकाशन

चित्तप्रकाशनाचे माझे काही अनुभव प्रथम सांगतो. ते वाचल्यावर असे लक्षात येईल की यासारखे अनुभव सगळ्यांनाच येतात. फक्त  या दृष्टिकोनातून आपण त्याकडे पाहिलेले नसते. आपल्यालाही चित्त आहे हे कळण्यासाठी चित्त आपल्याला पकडून ठेवावे लागते. त्यासाठी त्याला काहीतरी आधार द्यावे लागतात. मला जेव्हा उपासनेचा विचार समजला, तेव्हा मी मागे वळून बघायला लागलो. आपण उपासना कधीपासून करायला लागलो

२ . उपासनेची तयारी  :  चित्तप्रकाशन Read More »

१ . उपासनेद्वारा स्वतःची घडण

प्रबोधिनीची उपासना कशी तयार झाली ? प्रबोधिनीतील उपासनेची एक विशिष्ट पद्धत आहे. आपण विशिष्टमंत्र विशिष्ट क्रमाने म्हणतो. तेच मंत्र आपण का म्हणतो ? मंत्रांचा तोच क्रम का आहे ? याबद्दल आधी थोडसं समजून घेऊ. त्यानंतर आपल्यामध्ये उपासनेने कोणते बदल झाले पाहिजेत व ते झालेले आपल्याला कसे जाणवू शकतात याबद्दल काही सांगता येईल. प्रबोधिनीची सगळी उपासना

१ . उपासनेद्वारा स्वतःची घडण Read More »

उपासनेतून प्रेरणा आणि प्रतिभा

. . . .  प्रबोधिनीच्या कामाला आत्तापर्यंत जे काही यश मिळालं त्याचं रहस्य दैनंदिन उपासनेत आहे. प्रबोधिनीचं आत्ताचं यश हाही अनेकांना चमत्कार वाटतो. हा सारा चमत्कार उपासनेतून घडला. नित्य उपासनेतून नवनवीन सुचत गेलं, ते प्रत्यक्षात आणण्याचा निश्चय पक्का होत गेला. प्रेरणेमुळे प्रतिभापूर्ण कार्यचिंतन, कार्यविस्तार, कार्यप्रशासन हे घडत गेलं. . . . . उपासनेने विचारांना टोक

उपासनेतून प्रेरणा आणि प्रतिभा Read More »

स्वतःला घडविण्यासाठी उपासना – प्रस्तावना

आजच्या आधुनिक काळात कोणी दुसऱ्या कोणाला घडवण्याची भाषा केली तर ते व्यक्तीच्या आत्मसन्मानाला धक्का देणारे ठरू शकते. पण बदलत्या स्थळ-काळानुसार आणि प्रसंगानुसार स्वतःची प्राधान्ये बदलावी लागतात, नवी कौशल्ये शिकावी लागतात, नवे ज्ञान संपादून वापरावे लागते. म्हणजेच स्वतःचे व्यक्तिमत्त्व घडवत राहावे लागते. पाण्याचा आकार ते ज्या भांड्यात ठेवले असेल तसा बनतो. पाण्याचा रंग आणि चव त्याच्यात

स्वतःला घडविण्यासाठी उपासना – प्रस्तावना Read More »

अपेक्षा- ‘विकसता विकसता विकसावे’ : भाग – १

निरूपण – मी प्रबोधिनीत पद्य म्हणायला लागलो, त्या काळात पद्य कोणी लिहिले आहे हे विचारायची आणि सांगायची पद्धत नव्हती. पद्य गायचे असते. ते स्फूर्तीगीत तरी असते किंवा समरगीत तरी असते किंवा संचलनगीत तरी असते, आणि म्हणताना वैयक्तिक गीत असते किंवा समूहगीत असते, एवढेच पद्यांचे प्रकार माहीत असत. ‘विकसता विकसता विकसावे’ हे पद्य दहा-बारा वर्षे म्हणत

अपेक्षा- ‘विकसता विकसता विकसावे’ : भाग – १ Read More »

आपल्याला नेहमी पडणारे प्रश्न

१) अस्थी आणण्यास कोणी जावे ? मृताच्या पत्नीसहित घरच्या ५ महिलांनी अस्थिसंकलनास जावे असे सांगितले आहे. घरी पाच जणी नसल्यास शेजारच्या महिला बरोबर घ्याव्यात. अलीकडील काळात  सोईनुसार असे निर्णय करावेत. २) श्राद्ध म्हणजे काय ? देशे काले च पात्रे च श्रद्धया विधिना च यत् | पितृन्‌‍ उद्दिश्य विप्रेभ्यः दत्तं श्राद्धं उदाहृतम्‌॥ (ब्रह्मपुराण)        योग्य स्थळी,

आपल्याला नेहमी पडणारे प्रश्न Read More »

परिशिष्ट

धर्मकार्यातील विविध संकल्पना आपणास माहिती असतात. परंतु त्यांचे प्रयोजन  माहिती नसते. या प्रकरणात अशा विविध संकल्पनांचे स्पष्टिकरण केले आहे. धर्मकार्यात वापरल्या जाणाऱ्या काही गोष्टी या औषधी आहेत असे दिसते. अशा रोगनाशक गोष्टींची लोकांना ओळख राहावी यासाठी त्या धर्माशी जोडल्या असाव्यात असे वाटते. गणपतीच्या आवडीची म्हणून जी पत्री सांगतात ती सारीच्या सारी औषधी वनस्पतींची आहे हे

परिशिष्ट Read More »

प्रत्यक्ष धर्मविधी करताना ….

मागील चार प्रकरणांमधे आपण पाहिले की  धर्माचे दोन भाग असतात. तात्त्विक धर्म आणि आचारधर्म. स्वामी विवेकानंदांनी म्हटल्याप्रमाणे धर्म म्हणजे अनुष्ठाने व प्रतीके यांच्याद्वारे तत्त्वज्ञानाला दिलेले मूर्त रूप होय. विविध संस्कार, शांती, पूजा म्हणजे तत्त्वज्ञानाला मूर्त रूप देण्याचाच एक प्रयत्न  होय. मात्र या सर्व विधींमधे स्थलकालानुरूप परिवर्तन झाले पाहिजे. ते का व कसे झाले पाहिजे हेही

प्रत्यक्ष धर्मविधी करताना …. Read More »