वैचारिक

पद्य क्र. ६ – जननी जन्मभूमि स्वर्ग से महान है

निरूपण – आजचे पद्य मी संचलन करत असताना सर्व प्रथम म्हटले होते. संचलनाच्या तालावर म्हणता येणाऱ्या पद्यांमध्ये एक विशेष जोर असतो. गटात सर्वांबरोबर एकसारखे चालण्याची कृती करत असताना पद्य म्हणायचे असल्याने त्यात वर्णनपर, स्तुतीपर शब्दच जास्त असतात. समजून घ्यायला फार विचार करावा लागेल अशा कल्पना संचलन गीतामध्ये फारशा नसतात. सिंहगडावर झालेल्या एका अभ्यास शिबिरानंतर सिंहगड […]

पद्य क्र. ६ – जननी जन्मभूमि स्वर्ग से महान है Read More »

पद्य क्र. ५ – असू आम्ही सुखाने

निरूपण एक संस्कृत सुभाषित आहे.  त्याचा आशय असा की एखाद्या व्यक्तीचे मूल्य किंवा त्याची उत्तमता त्याच्या स्थानावरून निश्चित होत नाही तर त्याच्या गुणांवरून निश्चित होत असते. हे स्पष्ट करण्याकरता उदाहरण दिले आहे की राजवाड्याच्या शिखरावर बसला आहे म्हणून कावळ्याला कोणी पक्षीराज गरुड म्हणत नाहीत. आपल्या पदामुळे किंवा पदव्यांमुळे आपली श्रेष्ठता ठरत नाही. आपले कर्तृत्व, हृदयगुण

पद्य क्र. ५ – असू आम्ही सुखाने Read More »

पद्य क्र. ४ – बनें हम हिंद के योगी

निरूपण – काही पद्ये सोप्या शब्दांची व सोप्या चालीची असतात. म्हणायला सोपी, सांगायला सोपी आणि त्यांचा  सरळ शब्दार्थही समजायला सोपा. आजचे पद्य तसे आहे. पण जसा काळ गेला, जसे या पद्यावर चिंतन होत गेले, तसे या पद्यात एक मोठे सूत्र दडलेले आहे असे लक्षात आले, मागे ‘विकसता, विकसता ….’ या पद्याच्या निरूपणात आप्पांनी मांडलेले दर्शन

पद्य क्र. ४ – बनें हम हिंद के योगी Read More »

आम्ही जाउच जाऊ

निरूपण – प्रबोधन गीते म्हणजेच पद्ये गायची असतात अशीच सर्वसाधारण रीत आहे. पण पद्याचे अभिवाचनही प्रभावी होऊ शकते. एक पद्य आम्हाला शिकवतानाच ‘हे गायचे नाही, ठेक्यात आणि जोशात म्हणायचे आहे’, असे सांगून शिकवले होते. नंतर कोणीतरी या पद्याला चाल लावली. मला मात्र आधी शिकलो होतो तसेच, हे पद्य अभिवाचन करत म्हणायला आवडते. गेली काही वर्षे,

आम्ही जाउच जाऊ Read More »

दीपक तू हरदम जलता जा

निरूपण – पूर्वी पुण्याच्या ज्ञान प्रबोधिनी प्रशालेत वर्गशः पद्य गायनाच्या स्पर्धा होत असत. आजचे पद्य मी नववीत असताना आमच्या वर्गाने अशा एका स्पर्धेत म्हटलेले होते. तेव्हा आम्हाला पुणे विद्यापीठात हिंदी शिकवणारे दोन प्राध्यापक हिंदी शिकवायला यायचे. आम्ही हे पद्य म्हणतो आहोत, हे पाहिल्यावर दोघांनीही खोलात जाऊन वेगवेगळ्या प्रकारे, या पद्याचा अर्थ समजावून सांगितला होता. त्यामुळे

दीपक तू हरदम जलता जा Read More »

अपेक्षा- ‘विकसता विकसता विकसावे’ : भाग – २

निरूपण – या पद्याच्या दुसऱ्या व तिसऱ्या कडव्यात अनुक्रमे मनाच्या व प्राणशक्तीच्या विकासाबद्दल सांगितले आहे, असे आपण मागच्या भागात पाहिले. आता चवथ्या कडव्यात तपाने शुद्ध झालेल्या शरीराचे सार्थक कशात आहे, ते सांगितलेले आहे.  झिजविता झिजविता झिजवावेझिजुनि जीवनि महायश घ्यावेतनु झिजो जगती जणू चंदनमनो बनो विजयी अति पावन ||४|| शरीर या शब्दाचा अर्थच मुळी जे झिजते

अपेक्षा- ‘विकसता विकसता विकसावे’ : भाग – २ Read More »

परिशिष्ट  :  चिदानंद रूपी  शिव मी शिव मी

ज्ञान प्रबोधिनीमध्ये इयत्ता आठवीत विद्या-व्रत संस्कार झाल्यावर उपासनेत गायत्री-मंत्र म्हणण्याची प्रथा आहे. विद्या-व्रत संस्कार होईपर्यंत सातवीपर्यंतचे विद्यार्थी उपासनेमध्ये ‌‘परब्रह्मशक्ती स्फुरो ….‌’ या शक्ति-मंत्रांबरोबर ‌‘चिदानंदरूपः शिवोऽहम्‌‍ शिवोऽहम्‌‍‌’ हा संस्कृत मंत्र आणि ‌‘चिदानंदरूपी शिव मी शिव मी‌’ असा मराठी मंत्र म्हणतात.  शंकराचार्यांच्या आत्मषट्क या स्तोत्रातील प्रत्येक कडव्याचा शेवट ‌‘चिदानंदरूपः ….‌’ या ओळीने होतो.  आपले खरे स्वरूप लक्षात

परिशिष्ट  :  चिदानंद रूपी  शिव मी शिव मी Read More »

७.सामूहिक उपासना कशासाठी?

समूहशक्तीची जाणीव व तिची अभिव्यक्ती             समूहशक्तीचे जागरण सामूहिक उपासनेने होते की संघटनाने होते ? व्यक्तीप्रमाणे समूहाचेही चित्त असते. नुसत्या गदला या सामूहिक चित्ताची जाणीवच नसते. एखाद्या भयंकर घटनेची अफवा पसरली की सामूहिक चित्तामध्ये भीतीची भावना पसरते. एखादा जमाव बिथरला आणि झुंड म्हणून प्रक्षोभक कृती करायला लागला की समूहचित्तामध्ये क्रोधाची भावना पसरते.  एखादा लोकसमूह रागावलेला

७.सामूहिक उपासना कशासाठी? Read More »

६.व्यक्तिगत उपासनेतून स्वतःमध्ये होणारे बदल

उपासनेबद्दलचे प्रश्न             ज्यांना  ज्ञान प्रबोधिनीचा नव्यानेच परिचय होतो, त्यांतले अनेक जण ‌‘उपासना केलीच पाहिजे का ?‌’‌‘उपासना कशासाठी ?‌’ ‌‘उपासना केल्याने काय मिळते?‌’, ‌‘उपासनेचा व्यक्तिमत्त्वावर काय काय परिणाम होतो ?‌’ असे प्रश्न विचारतात. अशा काही प्रश्नांची उत्तरे देण्याचा पुढे प्रयत्न करणार आहे. उपासनेमुळे मनाला स्थिरता येते, प्रसन्नता येते, सामर्थ्य प्राप्त होते असे कै. आप्पांनी उपासनेच्या

६.व्यक्तिगत उपासनेतून स्वतःमध्ये होणारे बदल Read More »

५. उपासनेतून चित्तप्रेरणा

‌ ‘मी एक आहे, अनेक व्हावे‌’ अशी प्रेरणा परब्रह्मशक्तीला झाली आणि त्यातून विश्वाचा सारा पसारा निर्माण झाला. हा पसारा निर्माण करणे ही परब्रह्मशक्तीची लीला आहे आणि त्या लीलेतच तिला आनंद वाटतो असे भारतीय अध्यात्मशास्त्र सांगते. आधी प्रेरणा मग पसारा. त्या पसाऱ्यातले आपण एक अतिसूक्ष्म अंश. आपल्या मूळ प्रेरणेचा शोध घ्यायचा असेल तर आधी पसाऱ्याशी तद्रूप

५. उपासनेतून चित्तप्रेरणा Read More »