ज्ञान प्रबोधिनीची प्रथम प्रतिज्ञा

९. प्रतिज्ञेचे स्वरूप

आपण कोणतेही काम नैसर्गिक प्रेरणेने किंवा काहीतरी मिळवण्याच्या / टाळण्याच्या इच्छेने किंवा ते आपले कर्तव्य वाटते म्हणून करतो. पहिल्या दोन प्रकाराने काम करताना ‘हे काम का करायचे?’ याचा विचार कमी होतो. कर्तव्य म्हणून काम करताना ‘हे काम का करायचे?’ याचा विचार प्रत्येकाला आपल्या कुवतीनुसार करावा लागतो. प्रतिज्ञा करण्याचे ठरवताना असा विचार सुरू होतो. आपल्या प्रत्येक […]

९. प्रतिज्ञेचे स्वरूप Read More »

८. राष्ट्रासाठी कृती

११वी-१२वीतील युवकांसाठी व युवतींसाठी वीरव्रत संस्काराची योजना करायचे ठरवले आहे. प्रबोधिनीत येणारे सर्वचजण ‘राष्ट्रार्थ भव्य कृती काही पराक्रमाची’ आपल्या हातून घडावी अशी इच्छा करत असतात. अगदी ‘राष्ट्रार्थ’ ही झाली पाहिजे व ‘पराक्रमाची’ ही झाली पाहिजे. वीरव्रत घेणे म्हणजे ‘पराक्रमाची कृती’ करायची ठरवणे, आणि प्रथम प्रतिज्ञा घेणे म्हणजे ‘राष्ट्रार्थ कृती’ करायाची ठरवणे. वीरव्रत काही वर्षांसाठी घेऊन

८. राष्ट्रासाठी कृती Read More »

७. हिंदू राष्ट्र आणि भारत राष्ट्र एकच

हिंदू धर्म, हिंदू संस्कृती आणि हिंदू समाज म्हणजे आपले राष्ट्र असे शब्द पहिल्या प्रतिज्ञेत आहेत. या राष्ट्राची सेवा म्हणजे बहुतेकांना येथील समाजाची सेवा हेच प्रथम डोळ्यासमोर येते. तेथून सुरुवात करायची आहे. समाजाची सेवा करता करता त्या समाजाची संस्कृती आणि तिच्या मुळाशी असलेले अध्यात्म याचा हळूहळू परिचय होत जातो. हिंदू धर्म म्हणजे भारतीय अध्यात्म असे म्हटले.

७. हिंदू राष्ट्र आणि भारत राष्ट्र एकच Read More »

६. समाजाशी एकरूप होऊया..

मागच्या लेखाच्या शेवटी दिलेले जे सामूहिक व व्यक्तिगत कृतिसंकल्प आहेत ते सगळे समाजाशी व देशाशी एकरूप होण्याचे म्हणजेच समाजात स्वतःला विरघळवून टाकण्याचे संकल्प आहेत. सामूहिक संकल्प केले ते बाकी कोणी पाळते आहे की नाही हे न पाहता स्वतः पाळायचा प्रयत्न करणे म्हणजे समाजात स्वतःला विरघळवून टाकणे. प्रबोधिनीने रूढ केलेल्या मातृभूमी पूजनाच्या वेळी शेवटी जे व्यक्तिगत

६. समाजाशी एकरूप होऊया.. Read More »

५. संघटना करणे महत्त्वाचे..

प्रथम प्रतिज्ञितांचे तिसरे काम आहे आपण संघटित होणे आणि इतरांना संघटित करणे. आपण चांगलं म्हणजे समाजाला अनुकूल वागतो. पण एकट्याने समाजाला अनुकूल बनविण्याचे धाडस आपल्याला बऱ्याच वेळा होत नाही. त्यामुळे समाजाला अनुकूल बनविण्याचे काम एकेकट्याने करण्यापेक्षा गटाने करणे सोयीचे जाते. गटाने काम करायला शिकायचे असते. मी गटासाठी व गट समाजासाठी हे लक्षात ठेवून काम करायला

५. संघटना करणे महत्त्वाचे.. Read More »

४. मी करेन.. इतरांनाही सांगेन..

Hints on Nattional Education मध्ये निवेदितांनी civic sense, public spirit, organised unselfishness आणि identification with the Nation हे राष्ट्रीय शिक्षणाचे जे चार पैलू मांडले आहेत, त्याचा संदर्भ मागच्या पत्रामध्ये होता. मागच्या पत्रात ‘समाजाला अनुकूल बनण्याचा’ जो उल्लेख होता तो civic sense चा विस्तार होता. या पत्रात public spirit चा विस्तार बघूया. Civic sense म्हणजे goodness

४. मी करेन.. इतरांनाही सांगेन.. Read More »

३. देशसेवेची सोपी रूपे

प्रथम प्रतिज्ञेप्रमाणे देशसेवा करायची तर त्याचे चार भाग आहेत. पहिला भाग आहे समाजाला अनुकूल बनण्याचा, दुसरा भाग आहे समाजाला अनुकूल बनविण्याचा, तिसरा भाग आहे संघटित होण्याचा व संघटित करण्याचा आणि चौथा भाग आहे समाजात स्वतःला विरघळवून टाकण्याचा. समाजात राहत असताना सगळ्यांनाच काही स्वयं-अनुशासन पाळावे लागते. सर्वांचे हित करण्यामध्ये आपण परतंत्र आहोत, म्हणजेच आपले वागणे इतरांची

३. देशसेवेची सोपी रूपे Read More »

२. इतरांचा विचार आणि रोजची उपासना

ज्येष्ठ महिन्याच्या चिंतनात विद्यार्थि-दशा संपल्यानंतर प्रौढ सदस्यांच्या व्यावहारिक आयुष्यात आठ व्रते घेण्यासारखी आहेत असे म्हटले होते. त्यापैकी पहिल्या सहा व्रतांमुळे आत्मसन्मान, स्वावलंबन, तत्परता, गुणवत्ता, सततची प्रगती व प्रतिभा हे गुण वाढू शकतील असे ही म्हटले होते. सातवे व्रत – ‘प्रत्येक कामात इतरांच्या हिताचा विचार केलाच पाहिजे’ असे होते. त्यामुळे आपल्या मनातील राष्ट्राची कल्पना स्पष्ट होत

२. इतरांचा विचार आणि रोजची उपासना Read More »

१. व्रत म्हणजे काय?

आपले खाणे-पिणे, हिंडणे-फिरणे, व्यायाम, अभ्यास, दिनक्रम म्हणजेच आपले दिवसभराचे वेळापत्रक. त्यात कोणती कामे करावीत आणि कोणती कामे करू नयेत या संबंधी आपणच काही नियम केले, ते नियम आग्रहाने पाळले म्हणजे आपल्या व्यक्तिमत्त्वात पाहिजे तसा चांगला बदल होतो. असा फार पूर्वीपासून अनेकांचा अनुभव आहे. मी काही नियम स्वतः केले व पाळले, तर मला हवे तसे माझे

१. व्रत म्हणजे काय? Read More »