सार्थता सामूहिकता शिस्त समभाव स्वयंपौरोहित्य

संत्रिका
ज्ञानप्रबोधिनीच्या संस्कार-पद्धतीची वैशिष्ट्ये
सार्थता -संस्काराचा अर्थ समजून घेणे.
सामूहिकता – उपस्थित सर्वांचा संस्कारविधीत सक्रिय सहभाग.
शिस्त – कार्यक्रमाचे सुयोग्य नियोजन , कार्यक्रम शांततेत पूर्ण होणे.
समभाव -समाजातील सर्वांचा सहभाग. स्त्री-पुरुष दोघांनाही समान स्थान.
स्वयं पौरोहित्य -पोथीच्या आधारे स्वत:च स्वत:च्या घरातील विधींचे पौरोहित्य करणे.
संत्रीकेची अधिक माहिती जाणून घेण्यासाठी खाली दिलेल्या link वर click करावे. पुरोहितांचे नंबरही खाली दिलेल्या link मध्ये आहेत.

History
Sanskrit Sanskruti Sanshodhika – estb: 22nd July 1975
Conducting samskaras in a disciplined, relevant form by explaining the meaning and with participation of all.
Booklets of all samskaras including naming ceremony, thread ceremony, completion of 60 years of age Learn More

GUIDES TO CONDUCT RITUALS
🌺ज्ञान प्रबोधिनी,संस्कृत संस्कृति संशोधिका🌺
मराठी
श्री गणेश प्रतिष्ठापना पूजा Learn More
रामायण संग्रह
भव्य रामायण संग्रह आहेत. सुमारे २००० विविध भाषा, लिपी, प्रांत आणि देशांच्या मधील रामायण प्रती यात आहेत.
भाषा, संस्कृती, लिपी आणि रामचरित्र अभ्यासकांना ह्या भव्य प्रकल्पात सहभागी होण्याचे खुले आवाहन
दिपावलीतील लक्ष्मीपूजन
दीपावलीतील लक्ष्मीपूजन
आश्विन वद्य अमावास्येला सायंकाळी लक्ष्मीदेवतेचं पूजन करण्याची आपल्याकडे प्रथा आहे. खरं तर रोजच सायंकाळी घराची दारं लक्ष्मीच्या स्वागताला उघडी ठेवून, देवापुढे दिवा लावून, आपण शुभंकरोति म्हणतो, त्यात “घरातली इडापिडा बाहेर जावो, बाहेरची लक्ष्मी घरात येवो, घरच्या धन्याला उदंड आयुष्य देवो ” अशी प्रार्थना आपण करतोच. परंतु लक्ष्मीपूजनाच्या दिवशी या प्रार्थनेचं विशेष महत्त्व आहे. बलिप्रतिपदेला म्हणजे दिवाळीच्या पाडव्याला विक्रम संवतानुसार नवीन वर्ष सुरू होतं. अनेक व्यापार-व्यावसायिकांचं आर्थिक वर्षही दिवाळीच्या पाडव्यापासून सुरू होतं. त्यामुळे हिशेबाच्या नवीन वह्यांची आदल्या दिवशी लक्ष्मीपूजनाच्या वेळी पूजा करतात. त्यावेळी जुन्या वह्याही काही लोक पूजेत ठेवतात. तिजोरी-तराजू-लेखण्यांची देखील पूजा करण्याची काही ठिकाणी पद्धत असते. यामागील भाव आणि विचार समजून घ्यावा.
हो उदंड येथे नीतिमंत श्रीमंती । या घराघरातुन वसो क्षेम-सुख-शांती ।
सचोटीने, नीतीने,कष्ट करून पुष्कळ संपत्ती मिळवावी, घरात समृद्धी, समाधान, शांती असावी, ‘ईशावास्यम् इदं सर्वम् ‘ असं म्हणत आपल्याला मिळालेलं धन देवाला अर्पण करून त्याचा प्रसाद म्हणून ते स्वीकारावं असं आपल्या पूर्वजांचं सांगणं आहे. लक्ष्मी ही संपत्तीची देवता आणि भगवान विष्णूंची पत्नी. भगवान विष्णू हे जगाचे पिता, म्हणून लक्ष्मीला त्रिभुवनाची माता समजतात. विष्णू म्हणजे विशाल, सर्व काही व्यापणारा असा विचार करणार्या व्यक्तीला धन-समृद्धी मिळते असे मानले जाते. चांगल्या मार्गाने धन मिळविणं ही आईची पूजा आहे असं मानतात आणि दुसर्याला फसवून, कपटाने, भ्रष्टाचाराने मिळविलेलं धन म्हणजे आईचा अनादर होय असे आपण मानतो. वहीपूजन करण्यामागचा भाव असा असतो की पराक्रम-पुरुषार्थाने आम्ही वर्षभरात उदंड संपत्ती मिळवावी. देवापुढे नि:शंक मनाने ठेवता येतील एवढे आमचे आर्थिक व्यवहार निर्मळ, प्रामाणिक असावेत.
प्रत्येकच उद्योग, व्यापार, व्यवसाय ही ईश्वराची पूजा होवू शकते. त्यामुळे व्यवसायाची साधनं ही एक प्रकारे पूजेचीच साधनं असतात, मग ती लेखणी असो, तराजू असो, नांगर असो की यंत्र असो. या सर्वांची पूजा आपण दसर्या-पाडव्याला करतो. घरातील पवित्र ग्रंथ, विद्यार्थ्यांची पुस्तकेही पूजेत ठेवतो. ज्या साधनांच्या आधारे जीवनात आपण यश मिळवितो त्या साधनांबाबत अशा रीतीने कृतज्ञतेचा भाव आपण व्यक्त करीत असतो.
लक्ष्मीपूजनाच्या निमित्ताने ‘आर्थिक व्यवहारातील सचोटी व नीती’ आणि ‘अर्थप्राप्तीच्या साधनांविषयी कृतज्ञता’ अशी दोन महत्त्वाची मूल्यं मनात रुजतात; म्हणून या पूजेची विशेषता आहे.
अधिक माहिती साठी लक्ष्मी पूजनाचा व्हिडिओ पाहावा . Learn More
पौरोहित्य
ज्ञा.प्र. प्रणीत धार्मिक संस्कारांसाठी
पौरोहित्य प्रशिक्षण वर्ग
हिंदू समाजातील अनेकांना विविध निमित्तांनी घरात अथवा संस्थेत काही धार्मिक संस्कार करवून घेण्याची गरज वाटत असते. हे संस्कार त्यातील अर्थ समजून घेऊन व्हावेत, नवशिक्षितांना संस्कारामधील उदात्त आशय कळावा, जे लोक कर्मकांडास कंटाळले आहेत त्यांना आधुनिक काळाला योग्य असे महत्त्वाचे पण सुटसुटीत विधी करता यावेत या हेतूंनी ज्ञानप्रबोधिनीने ‘धर्मनिर्णय मंड़ळ, लोणावळा’ यांच्या मार्गदर्शनाखाली व सहकार्याने विविध संस्कारांच्या (मंत्र आणि अर्थ यांनी युक्त अशा) पोथ्यांची रचना केली आहे.
ज्ञान प्रबोधिनीच्या पद्धतीने पौरोहित्य करू इच्छिणार्या अथवा केवळ ही पद्धत समजून घेण्याची इच्छा असणार्या स्त्री-पुरूषांसाठी ज्ञानप्रबोधिनीत १९९० सालापासून पौरोहित्य प्रशिक्षणाचे वर्ग घेतले जात आहेत. या वर्गांमधून प्रशिक्षित झालेल्या महिला आणि पुरूष-पुरोहितांचा एक संच ज्ञानप्रबोधिनीच्या पद्धतीने संस्कारविधी करण्याचे कार्य करीत आहे. त्या शिवाय या वर्गामधून प्रशिक्षित झालेले अनेक स्त्री-पुरूष स्वयंपुरोहित म्हणून स्वत:च्या घरातील संस्कार स्वत:च ज्ञानप्रबोधिनीच्या पोथ्यांच्या आधारे करीत आहेत.
ज्ञा. प्र. ची भूमिका समजावून घेण्यासाठी जिज्ञासूंनी’संत्रिका’ विभागाने प्रकाशित केलेले ‘धर्मविधींच्या अंतरंगात’ हे पुस्तक पाहावे. Learn More
Research
🌺ज्ञान प्रबोधिनी,संस्कृत संस्कृति संशोधिका🌺
श्री गणेश प्रतिष्ठापना पूजा Learn More
Social Integration
From Prabodhini’s perspective, including all castes and genders into Paurohitya is major step for social integration Learn More
Santrika, 511, Sadashiv Peth, Pune, Maharashtra, India. Pin – 411030 | Phone: +91-20-24207000, +91-20-24477691 | Email:[email protected]