महालय श्राद्ध माहिती पत्रक
1) श्राद्धाची संकल्पना - श्राद्धाचा विधी करताना अनेकांच्या मनात आपलं काही चुकल्यास मृत व्यक्तीला सद्गती मिळणार नाही का? असे विचार डोकावतात; पण अशी भीती अथवा शंका यांचा पगडा मनावर असणे योग्य नाही. कारण ‘श्रद्धया क्रियते यत् तत् श्राद्धम्।’ हणजे ‘श्रद्धायुक्त अंतःकरणाने केले जाणारे एक कर्म’ अशी श्राद्धाची व्याख्या आहे. ज्याप्रमाणे आपण देवाचे पूजन करतो त्याप्रमाणेच पितरांचे केलेले पूजन हणजे श्राद्ध.
2) श्राद्धविषयक रूढी - भाद्रपद महिन्यातील कृष्ण पक्षात (पितृपंधरवडा) निधनतिथीला महालयश्राद्ध करण्याचीही पद्धती रूढ आहे. महालय श्राद्धामध्ये आपल्या कुटुंबातील सर्व दिवंगतांचे एकत्रित पूजन केले जाते तसेच ज्ञात-अज्ञात, आप्त, नेही यांना उद्देशूनही पूजन केले जाते. तसेच भरणी श्राद्ध करण्याची प्रथाही समाजात रूढ आहे. ज्या व्यक्तीचे निधन भरणी नक्षत्रावर झालेले असते त्या व्यक्तीच्या स्मरणार्थ भरणी नक्षत्रावर हे श्राद्ध केले जाते. हे सर्व विधी करण्यासाठी बराच वेळ खर्च होतो. तसेच या जोडीने ब्राह्मणांना व आप्तांना भोजन दिले जाते. या सर्वांचा आर्थिक भारही बराच पडतो. यातील अनेक बाबी शास्त्रदृष्ट्या अपरिहार्य नसूनही भातीपोटी केल्या जातात. ज्ञान प्रबोधिनी पद्धतीने भरणी श्राद्ध केले जात नाही.
3) ज्ञान प्रबोधिनी पद्धतीचा महालय श्राद्धविधी - भाताचे पिंड हे दिवंगत व्यक्तींचे प्रतीक. ज्याप्रमाणे देवांची पूजा केली जाते त्याप्रमाणे श्राद्धात पितरांची पूजा करतात. गंध, काजळ, लोकर, दह्याची साय इ. पितरांना अर्पण केले जाते. धूप, दीप, नैवेद्य व दक्षिणा हे उपचारही केले जातात. देवतापूजनापेक्षा पितरांच्या पूजनाचा वेगळेपणा लक्षात येण्यासाठी काळे तीळ, माक्याची पाने व पांढरी फुले वापरली जातात. यानंतर पितरांची प्रार्थना केली जाते. या श्राद्धविधीला अंदाजे एक ते दीड तास लागतो.
4) स्त्रियांचा सहभाग – श्राद्धविधीत स्त्रियांचाही सहभाग अपेक्षित आहे. स्त्रियादेखील आपल्या आप्तांचे श्राद्ध करू शकतात.
5) श्राद्धाचा नैवेद्य – श्राद्धाच्या नैवेद्यासाठी काही विशिष्ट पदार्थ करण्याची पद्धत आहे; परंतु प्रबोधिनीतर्फे असा आग्रह धरला जात नाही. यजमान आपल्या इच्छेनुसार नैवेद्याची योजना करू शकतात.
6) साहित्याची यादी
क) 1) गंध, 2) उदबत्त्या व घर, 3) तेल, तेलवात, 4) फुलवाती व तूप, 5) काडेपेटी, 6) विड्याची दोन पाने, 7) एक सुपारी, 8) एक नाणं
ख) 1) नीरांजन/समई, 2) एक तांब्या, 3) एक भांड, चार-पाच वाट्या, 4) दोन ताम्हन, 5) एक पळी, 6) दोन चमचे, 7) दोन ताटं, 8) दोन पाट (आसने), 9) हात पुसण्यासाठी रुमाल, 10) कात्री
ग) 1) 2 चमचे सायीचे दही, 2) लोकर – बोटभर लांबीचे तुकडे (पिंडाच्या संख्येनुसार) 3) एक ते दोन वाटी तांदळाचा भात (जितके पिंड करायचे त्या अंदाजाने भात करावा. छोटे लिंबाच्या आकाराचे पिंड करावेत. 4) अर्धी वाटी काळे तीळ, 5) पांढरी फुले, 6) माक्याची किवा तुळशीची पाने, 7) दर्भ दोन जुड्या, 8) काजळ, 9) नैवेद्य (लाडू/खीर इ.), 10) शक्य झाल्यास केळीचे पान किवा दोन पत्रावळ्या.
7) धनादेश, रोख, किंवा ई हस्तांतरण (cheque, cash, e-transfer) यापैकी कोणत्याही प्रकारे संस्थेला देणगी देताना देणगी देणाऱ्या व्यक्तीचा पॅन आवश्यक आहे.
8) पुरोहित दक्षिणा – महालय श्राद्ध
संस्थेची देणगी – रु. ५००/- पुणे शहरात दक्षिणा – रु. १०००/-
पिंपरी चिंचवड दक्षिणा – १२००/- १२५ कि.मी. पर्यंत रु. १४००/-
२५० कि.मी. पर्यंत रु. १६००/- महाराष्ट्रात ५०० कि.मी. पुढे दक्षिणा रु. २४००/-
महाराष्ट्रा बाहेर भारतात रु. २८००/-