वार्षिक वृत्त २०२४ – २०२५
प्रास्ताविक :
नागरी वस्ती अभ्यास गटाने यावर्षी विविध वस्त्यांमध्ये मुलांबरोबर शैक्षणिक व अन्य क्षमता विकसनाचे उपक्रम घेतले. सर्वांसाठी सर्वांगीण व्यक्तिमत्व विकसन या उदिष्टानुसार किशोर, किशोरी, युवती, महिला सर्वांच्या व्यक्ती गुण व नेतृत्व गुण विकासासाठी वर्षभर प्रयत्न केले गेले. विशेष म्हणजे या वर्षी विभागाने एकात्मता महोत्सव साजरा केला. त्यामधून एकतेच्या अनेक रूपांची अनुभूती घेतली.
११९८ किशोर – किशोरींसाठी ३० महिला व युवतींनी वर्षभर काम केले.
- बालविकास प्रकल्प – पुण्यातील पंधरा वस्त्यांमध्ये ३१७ मुलांसाठी बालविकास प्रकल्प घेतला गेला. विविध बौद्धिक क्षमतांचे विकसन व नेतृत्वगुण व व्यक्तीगुण या पैलुंवर काम केले गेले. प्रज्ञा मानस – क्षमता विकसन विभाग, सुजाताताई होनप आणि त्यांच्या गटाने अनेक कृती सत्रांच्या आधारे क्षमता विकसन बाबतचे प्रशिक्षण घेतले.
चांगल्या सवयी चांगला माणूस” या विद्याव्रत संकल्पनेवर आधारित व्याख्यानमाला व चर्चा सत्रं सुधाताई आणि गटाने घेतली. याचा फायदा मुलांबरोबरच केंद्र चालवणाऱ्या ताईंनापण झाला. सर्वांच्याच व्यक्तिमत्व विकासाला या कामातून मदत झाली.



शैक्षणिक साधन केंद्राच्या विभागप्रमुखांची वडारवाडी केद्रांला भेट | सहल – ऐतिहासिक स्थळ, पर्वती बालविकास केंद्र – फुरसुंगी केंद्र | आनंदी शिक्षण – गोपाळवाडी आवडीने व्हिडिओ समजून घेताना मुले |
२) आनंदी शिक्षण – या प्रकल्पामध्ये आठ वस्त्यांमधील पहिली ते पाचवीच्या १४३ मुला-मुलींसाठी काम केले गेले. मुलांना लिहिता वाचता येणे, भाषा व गणित या विषयांवर काम केले. या साठी मुलांना भाषा व गणित या विषयांचे व्हिडिओ दाखवले . ते दाखवल्यानंतर स्वाध्याय म्हणून शैक्षणिक साधन केंद्राने सराव पुस्तिका तयार केल्या. इयत्तेनुसार ते मुलांकडून सोडवून घेतले. या प्रकल्पामध्ये २ उपक्रम राबविले आहेत
3) छोटे शेतकरी – या उपक्रमामध्ये मुलांना झाडे लावायचे काम दिलेले होते आणि शिक्षक फक्त मार्गदर्शन करतील असे सांगण्यात आले होते आणि मुलांना कार्ड दिले होते. एकंदरीत मुलांना शेतीविषयी ज्ञान मिळावे, झाड लावताना कोणती काळजी घ्यावी, किती प्रमाणात पाणी द्यावे. थोडक्यात बौद्धिक आणि व्यवाहारिक ज्ञान यावे, ही उद्दिष्ट्ये होती. छोटे शेतकरी – पान, फुल, खोड, मूळ, फांद्या या झाडांच्या अवयवांची ओळख निसर्ग मित्र . या उपक्रमामध्ये मुलांनी निसर्गाचे निरीक्षण करायचअशी झाली. झाड लावण्यासाठी काय काय करायचे हे समजले. इयत्तेनुसार मुलांना विषय निवडून दिलेले आहेत. इयत्ता ५ वीच्या मुलांना प्राणी किंवा वनस्पती हे विषय दिले आहेत. पहिल्या फेरीमध्ये मुलांनी प्राणी व वनस्पती या विषयास अनुसरून M.C.Q प्रश्न मुलांकडून सोडवून घेतले. दुसऱ्या फेरी मध्ये
18 वस्त्यांमध्ये 466 मुलांसाठी व्यक्तिमत्व विकास साठी काम झाले | ||||
क्र | नाव | आंनदी शिक्षण | बालविकास | दले |
१ | लक्ष्मीनगर -पर्वती | १८ | २० | |
२ | जनता वसाहत -पर्वती | १८ | २० | |
३ | माळवाडी -वारजे | १८ | २० | |
४ | मातंग वस्ती -सदाशिव पेठ | २० | ||
५ | चतुर्श्रुंगी -शिवाजीनगर | २० | ||
६ | कालवड -लोहगाव | २० | ||
७ | वैदुवादी -हडपसर | २० | २० | |
८ | काशिवाडी -भवानीपेठ | २० | ||
९ | दत्तवाडी | २० | ||
१० | ओटावसाहत | २० | ||
११ | वराडवाडी -फर्गुसन कॉलेज जवळ | २० | २० | ४० |
१२ | वडगाव शेरी | २० | ||
१३ | खजुरेवस्ती-हडपसर | १७ | ||
१४ | ज्ञानगंगा-फुरसुंगी | २० | २० | |
१५ | मार्कंडेवस्ती -हडपसर | २० | ||
१६ | गोपाळवाडी -हडपसर | १७ | ||
१७ | वेदुवाडी – चतुर्श्रुंगी | १७ | ||
१८ | जोशी वाडा- सदाशिव पेठ | १५ | २० | |
एकूण | १४३ | ३१७ | ६० |
शारदोत्सव

रांगोळी प्रशिक्षण

छोटे शेतकरी


विद्याव्रत

बालविकास केंद्र

वडारवाडी दल
४) शाळांमधील उपक्रम – चांगल्या सवयी, चांगला माणूस , विद्याव्रत संकल्पनेवर आधारित…
शाळेचे नाव | मुलांची संख्या | सत्रं – तास |
विश्वकर्मा (अप्पर इंदिरा नगर ) | १२० सहावी मुले-मुली (व्यक्तिमत्व विकसन) | ५ तास |
विश्वकर्मा (अप्पर इंदिरा नगर) | १२० सातवी मुले-मुली (विद्याव्रत संस्कार) | ५० तास |
विश्वकर्मा (अप्पर इंदिरा नगर) | १२० आठवी मुले-मुली (जोपासना सत्र) | ६ तास |
विश्वकर्मा (अप्पर इंदिरा नगर) | १२० नववी मुले-मुली (जोपासना सत्र) | ६ तास |
विश्वकर्मा (अप्पर इंदिरा नगर | १२० दहावी मुले-मुली (अभ्यासपर मार्गदर्शन) | ३ तास |
प्रज्ञा शाळा (फुरसुंगी ) | ८० आठवी मुले-मुली (विद्याव्रत तासिका) | ११ तास |
विविध केंद्रातील मुले | ५० सातवी पासून पुढील इयत्तेतील मुले-मुली (विद्याव्रत तासिका) | ४० तास |
राठी शाळा | ४० आठवी मुले-मुली (विद्याव्रत तासिका) | ५ तास |
वस्त्यांजवळील ३ शाळांमध्ये व्यक्तिमत्व विकसन तासिका, मेळावे, शिबिरे यांमधून एकूण ७७० मुला-मुलींसाठी काम झाले.
अप्पर इंदिरा नगर

विद्याव्रत संस्कार

विद्याव्रत शिबीर


युवती विकास – युवतींच्या विकासातही व्यक्ती गुण व नेतृत्व गुण विकसित होणे यासाठी विविध प्रक्रिया घडवल्या जातात.
- विभागातून वस्त्यांमध्ये मुला-मुलींबरोबर घेतल्या जाणाऱ्या अनेक उपक्रमांचे नेतृत्व जाणीवपूर्वक युवतींकडे सोपवले जाते. उदा – साप्ताहिक दले – मुलांसाठीचे प्रकल्प, शिबिरे, सहली इत्यादी, तासिकांमध्ये सहभाग .
- युवती प्रबोधन बैठक – विविध विषयावरील वाचन, चर्चा सत्रं होतात. उपासना, खेळ, पद्य इत्यादी एकत्र घेतले जाते. यावर्षी विद्याव्रत संकल्पनेनुसार आधारित चांगल्या सवयी, चांगला माणूस हा विषय युवतींनी समजून घेतला व शाळांमध्ये होणाऱ्या विद्याव्रत संस्कार शिबिरात मुलांसोबत महत्वाची भूमिका केली. गटचर्चा घेणे, पद्य शिकवणे खेळ व बरची नृत्य इ.
- शैक्षणिक मार्गदर्शन व शिष्यवृत्ती – दहावी पासुन पुढील शिक्षणासाठी युवतींबरोबर संवाद साधला गेला. आवश्यकते मार्गदर्शन केले गेले. गरजेनुसार शक्य ती रक्कम शिष्यवृत्ती म्हणून दिली गेली. एकूण ३,३१,२०० रुपये फक्त. ज्ञान प्रबोधिनी फाउंडेशन (j.p.f.) – यांच्या सहकार्याने १० युवतींना ३,०२,२०० रुपये रक्कम शिष्यवृत्ती म्हणून दिली.
- श्रीमती ललिता थत्ते – ३ युवतींना, २९००० रुपये हि रक्कम शिष्यवृत्ती म्हणून दिली. शिष्यवृत्तीमुळे युवतींचे शिक्षण स्थिरपणे सुरु राहण्यासाठी उपयोग झाला. शिष्यवृत्ती धारक युवतींनी औपचारिक शिक्षणाबरोबरच विभागातील – वस्ती पातळीवरील विविध कामांमध्ये सहभाग घेऊन अनुभव शिक्षणही घेतले आहे.
महिला विकास – सावित्री दल – महिलांसाठीचे उपक्रम नियमितपणे घडविण्यासाठी सहविचार समिती महिन्यातून दोन वेळा एकत्र जमत होती. ज्ञान प्रबोधिनी रचित आधुनिक विचारावर आधारित हरतालिका, गणेश प्रतिस्थापना, मातृभूमी पूजन या पोथ्यांचा परिचय करून घेतला. वर्षभरात मुख्य चार उपक्रम केले गेले. रामनमवी, आषाढी एकादशी – भजनोपासना, शारदोत्सव, आधुनिक नवरात्र (३ जानेवारी सावित्रीबाई फुले जयंती ते १२ जानेवारी राजमाता जिजाऊ जयंती) याकाळात नियोजित एकात्मता महोत्सव घेतला गेला.
एकात्मता महोत्सव – १२ जानेवारी २०२५ या दिवशी राजमाता जिजाऊंची व स्वामी विवेकानंद यांची जयंती दिवस विभागाने एकात्मता मोहोत्सव म्हणून साजरा केला. यामध्ये १८ व्यक्तींनी १८ समाज गटांची अभ्यासपूर्वक मांडणी केली. कार्यक्रमात प्रत्यकाने हातात पणती घेऊन मातृभूमीची आरती केली. पूर्वतयारी म्हणून अगोदर दोन महिने सहभागी झालेल्या युवती व महिलांनी काम केले. मुलांनी नाटक, प्रार्थना गीते या माध्यमातून लोकांना समाजदर्शन घडवले. उदा. वासुदेव, वैदु, बौद्ध प्रार्थना इत्यादी. मांडणी झालेले समाज गट व मांडणाऱ्या व्यक्ती या दिवसभराच्या उपक्रमात १६९ मुले-मुली आणि ४७ महिला, पुरुष असे एकूण सहभागी संख्या = २१६ जण सहभागी झाले. कार्यक्रमामध्ये अठरा समाज गटांवर आठरा व्यक्तींनी मांडणी केली व सूत्रसंचलन व अभ्यास अहवाल परिचय २ वेगळ्या व्यक्तींनी केला.

व्यक्तिमत्व विकसन प्रशिक्षण

शारदोत्सव – वैदुवाडी

रामनवनी भजनोपासना
अभ्यास अहवाल प्रकाशन व वितरण – २००२ ते २०२२ या वीस वर्षातील कामाचा अभ्यास अहवाल प्रकाशित झाला. ज्ञान प्रबोधनी नागरी वस्ती अभ्यास गटामार्फत २००२ ते २०२२ या कालावधी मध्ये विविध कामाच्या निमित्ताने एकूण – ८० वस्त्यांमध्ये पोहोचलो आहे. त्यामध्ये ४३ समाज गटांबरोबर संपर्क – संवाद झाला आहे. विविध सर्वेक्षणे यांद्वारे ४०,००० कुटुंबांपर्यत नागरी वस्ती अभ्यास गट पोहोचला. त्यातील विविध वयोगटातील ३०,०३६ लोक विविध उपक्रमात सहभागी झाले.

प्रकाशन दिनांक : २५ जानेवारी २०२५ सेतुबंधन मेळावा , पुणे

सेतुबंध मेळाव्यात विभागातील सहभागी कार्यकर्त्या अभ्यास अहवाल प्रकाशनाचा आनंद व्यक्त करताना.
वितरण – विविध संस्थाचे पदाधिकारी सामाजिक कार्यकर्ते व अभ्यासक इ. प्रत्यक्षात व सोशल मिडिया माध्यामातून अभ्यास अहवाल पोहचला आहे.

राष्ट्रीय एकत्मता महोत्सव
१२ जानेवारी २०२५
आधुनिक नवरात्र – विविध समाज गट मांडणी व सादरीकरणे












समारोप : एप्रिल २०२४ ते मार्च २०२५ या वर्षात झालेल्या कामाचे वृत्त आपण वाचले. अनेक युवती महिलांनी या कामातून अनुभव शिक्षण घेऊन स्वतःचे व्यक्तिमत्व समृद्ध केले आहे. कार्यासाठी लागणारा आर्थिक स्त्रोत अनेक देणगीदारांनी सढळ हाताने दिलेल्या देणग्यांमुळे उभा राहू शकला. विभाग सर्व देणगीदारांचे आभारी आहे.
विभागातील कामात सक्रीय सहभागी होण्यासाठी सगळ्यांचे नित्य स्वागत आहे. तसेच आर्थिक मदत करण्यासाठी आपली देणगी खालील नंबर वर ऑनलाइन ट्रान्सफर करावी. व त्याचा स्क्रीन शाँट ९४०३८५२७७४ या नंबर वर पाठवावा हि विनंती ऑनलाइन ट्रान्सफर Bank Of Baroda:89740100003397, IFSC Code: BARBOUJSADP या खात्यावर करावे, ही विनंती
पत्ता: ज्ञान प्रबोधिनी, नागरी वस्ती अभ्यास गट, विनायक भवन, ५ वा मजला, ५१४, सदाशिव पेठ, पुणे – ४११ ०३०.
संपर्क : हर्षाताई किर्वे 020-24207221, मोबाईल क्रमांक : 9403852774
Email : [email protected]
.