Hints on Nattional Education मध्ये निवेदितांनी civic sense, public spirit, organised unselfishness आणि identification with the Nation हे राष्ट्रीय शिक्षणाचे जे चार पैलू मांडले आहेत, त्याचा संदर्भ मागच्या पत्रामध्ये होता. मागच्या पत्रात ‘समाजाला अनुकूल बनण्याचा’ जो उल्लेख होता तो civic sense चा विस्तार होता.
या पत्रात public spirit चा विस्तार बघूया. Civic sense म्हणजे goodness किंवा चांगुलपणा. Public spirit म्हणजे positive goodness किंवा आक्रमक चांगुलपणा. म्हणजेच सार्वजनिक कामाचा उत्साह किंवा ‘समाजाला अनुकूल बनविण्याची’ उत्स्फूर्त कृती.
मी नियम मोडणार नाही, इतरांना नियमांनुसार वागायचे आवाहन करीन, नियमांनुसार वागायला लावीन. मी कॉपी करणार नाही, इतरांना कॉपी करू देणार नाही. मी रक्तदान करीन, इतरांना रक्तदान करायला शिकवीन. सार्वजनिक स्वच्छता वाढवण्याचे उपाय मी करीन आणि इतरांना शिकवीन. अन्यायाच्या ठिकाणी न्याय, गरिबीच्या ठिकाणी समृद्धी, बेकारीची जागी उत्पादक काम, बेशिस्तीच्या जागी शिस्त, अभावाच्या जागी मुबलकता, कृतिशून्यतेच्या जागी कृतीशीलता, अबोल्याच्या जागी मोकळा संवाद, हे सर्व मी करीन, इतरांना करायला सांगेन, इतरांना करायला लावीन, असे वागणे म्हणजे आक्रमक चांगुलपणा.
Civic sense हा passive किंवा self centered goodness आहे. तर Public spirit हे active किंवा other-centered goodness आहे. Public spirit शिवाय Civic sense दुबळा ठरू शकतो. Civic sense शिवाय Public spirit म्हणजे नुसताच उथळ पाण्याचा खळखळाट. ज्याला राष्ट्रसेवा करायची आहे त्याला civic sense म्हणजे समाजाच्या अनुकूल बनणे आणि public spirit म्हणजे समाजाला अनुकूल बनविणे हे दोन्ही करणे जमले पाहिजे.
आजपर्यंत या दोन्ही प्रकारची प्रत्येकी एक-एक गोष्ट करत असू तर प्रतिज्ञेनंतर दोन-दोन गोष्टी करायला लागले पाहिजे. आयुष्यभर या दोन्ही प्रकारच्या अधिकाधिक गोष्टी करण्याचा प्रयत्न राहिला पाहिजे. म्हणून हे आयुष्यभराचे व्रत आहे. दरवर्षी जास्तीचे काहीतरी करण्याचा संकल्प केला पाहिजे.
चातुर्मासामध्ये सामाजिक व्रते म्हणून, प्रतिज्ञा घेतली नाही त्यांनाही, दोन्ही प्रकारची एक-एक गोष्ट चार महिन्यांसाठी करून पाहता येईल. त्यातून प्रतिज्ञा घेण्याचे संकल्प होऊ शकतील. ज्यांनी प्रतिज्ञा घेतली आहे, त्यांनाही आपली इच्छाशक्ती वाढविण्यासाठी चातुर्मासामध्ये आणखी एक जास्तीची गोष्ट करण्याचे ठरवता येईल.
(एका कार्यकर्त्याला लिहिलेल्या पत्रातील काही भाग : सौर ज्येष्ठ २५ शके १९३०, दि. १५ जून २००८)
*************************************************************************************************************