आठ वर्षांपूव सर्वसाधारण प्रबोधिनीपण या पुस्तिकेची पहिली आवृत्ती काढली होती. प्रबोधिनीचे विद्याथ, सदस्य व कार्यकर्ते या सर्वांनाच सोप्या भाषेत मांडलेले प्रबोधिनीपणाचे गुण उपयुक्त वाटले.
या पुस्तिकेतला पहिला लेख 1995 मध्ये लिहिलेला आहे. पुढचे पाच लेख 2007 मध्ये लिहिलेले आहेत. शेवटच्या लेखाचा समावेश या पुस्तिकेत नव्यानेच केला आहे. तो 2009 मध्ये लिहिलेला आहे. नवीन आवृत्ती काढताना तीन लेखांमध्ये काही बदल केलेले आहेत.
स्वतःमध्ये सुधारणा करण्यासाठी सतत आत्मपरीक्षण करावे लागते. सर्वसाधारण प्रबोधिनीपणाचे गुण आपल्यामध्ये किती प्रमाणात आलेलेे आहेत हे तपासण्यासाठी या पुस्तिकेतील विवरणाचा उपयोग होऊ शकेल.
गिरीश श्री. बापट
संचालक