हे वीर विवेकानंद हिंदुयशमूर्ती
हे युवक प्रवर तू युवहृदयांची स्फूर्ती ।। ध्रु.।।
दास्यात पाहुनी विश्वधर्मजननी ही
तू क्षुब्ध सिंहसा व्याकुळ अंतर्यामी
मुक्तीचा तिचिया ध्यास तुला दिनराती ।।१।।
शत आघातांनी कुंठित मूर्च्छित झाली
ती हिंदुचेतना फिरून तू चेतविली
तिज उन्नत मस्तक निर्भय केले जगती ।।२।।
स्मरतात तुझे ते घनगर्जितसे शब्द
‘मन वज्र हवे अन् मनगट ते पोलाद’
जग जिंकायाची ईर्ष्या दाटो चित्ती ।।३।।
तव अमृतवाणी हाक देत आम्हाते
रे अतुल बलस्वी करू हिंदुराष्ट्राते
युवशक्ति हवी मज कार्यशरण पुरुषार्थी ।।४।।
जी जीवनपुष्ये सतेज नव रक्ताची
स्थापावा त्यांनी धर्म आत्म अर्पूनी
त्यानेच अर्चना होत राष्ट्रदेवाची ।।५।।
**********************************************************************************************