- पार्श्वभूमी : ज्ञान प्रबोधनी ही शैक्षणिक सामाजिक संस्था गेली ३० वर्षे वेल्हे तालुक्यातील गावांमध्ये शिक्षण ग्रामविकासनाचे तसेच महिला सक्षमीकरणाचे काम करीत आहे. बुद्धिमान विद्यार्थ्यांसोबत काम करण्याचा प्रदीर्घ अनुभव असलेला प्रज्ञा मानस विभाग तसेच ग्रामीण विभागात काम करणारा स्त्री शक्ती प्रबोधन विभाग यांनी एकत्रितपणे काम केल्यामुळे वेल्हे तालुक्यातील ० ते ३ वयोगटातील मुलांच्या पालकांसाठी व पर्यायाने मुलांच्या बुद्धिमत्ता विकसनास उपयुक्त काम केले आहे .
- पूर्व अनुभव: मुलांचे कुपोषण होऊ नये म्हणून वेल्हे तालुका दोन वर्षे अंगणवाडीत सोबत काम करण्याचा स्त्रीशक्ती प्रबोधन विभागाचा अनुभव आहे.११२ गावांमध्ये अंगणवाडी ताई सोबत दोन वर्ष काम केल्यानंतर वेल्हे तालुका(पुणे विभागातील ) सहा जिल्ह्यांमध्ये कुपोषण मुक्ती कार्यक्रमात पहिला आला.
या अनुभवानंतर मुलांच्या विश्वातील अंगणवाडी ताई बरोबर मुलांच्या सर्वात जास्त संपर्कात येणाऱ्या त्यांच्या मातांसोबत काम केले तर मुलांच्या शैक्षणिक बौद्धिक विकासासाठी उपयुक्त होईल असे वाटल्याने सदर प्रकल्प करण्याचे ठरविले.
मुलांच्या बुद्धीचा विकास ० ते ६ वयोगटात होतो. पैकी पहिल्या टप्प्यात ० ते ३ वयोगटातील मुलांच्या पालकांसाठी पूरक उपक्रम करून पर्यायाने मुलांसाठी काम करण्याचे ठरविले.१
- मातांची पार्श्वभूमी: पहिले तालुक्यातील मातांना शिक्षणाचे संधी ही दुर्गमतेमुळे व शैक्षणिक सोयी सुविधा व वातावरणाच्या अभावामुळे मिळालेली नाही तसेच आजूबाजूचे वातावरण हे शिक्षणास पोषक नाही
यासाठी १० वी पास झालेल्या केव्हा १० वीच्या परीक्षेपर्यंत पोहोचलेल्या पालकांसाठी मुलांच्या संगोपनातून त्यांचा विकास कसा साधायचा याविषयी प्रशिक्षण देणे हे गरजेचे आहे पालकांना प्रशिक्षण दिले तरच त्या आपल्या पाल्यासाठी चांगला दर्जेदार वेळ देतील व पर्यायाने पाल्यांच्या विकासाकडे जातीने लक्ष देऊ शकतील.
शेती करणाऱ्या आणि घरगुती कामातून जास्ती वेळ काढणे अवघड असलेल्या महिलांसाठी महिन्यातून दोन दिवसांचा वेळ या प्रशिक्षणासाठी योग्य वाटला या साठी त्यांना पुढील १५ दिवस घरी करण्यासाठी छोट्या छोट्या कृती व खेळांचे उपक्रम व ते का करायचे त्यामुळे मुलांच्या बुद्धीवर आरोग्यावर इंद्रिया क्षमतांवर कसा कसा परिणाम होईल हे समजावून सांगायचे व कृती रूप गृहपाठ द्यायचा तर मुलांच्या विकास प्रक्रियेतील त्या चांगल्या साधन बनवू शकतील .यासाठी हा कृती उपक्रम ठरविला.
० ते ३ वयोगटातील मुलांच्या पालकांसाठी मुलांच्या आरोग्य ,इंद्रिय विकास व बौद्धिक विकासासाठी उपयुक्त अशा कृती ,खेळ व उपक्रमांचे प्रशिक्षण घेणे.
- उद्दिष्ट:
१)० ते ३ वयोगटातील मुलांच्या पालकांना मुलांच्या विकासाची संकल्पना स्पष्ट करणे.
२) असा विकास व्हावा म्हणून बहुतांच्या परिस्थितीत उपलब्ध साधनांच्या साह्याने काही खेळ व कृती तसेच उपक्रम घेऊन मुलांच्या विकासामध्ये सकारात्मक बदल होऊ शकतो याचे प्रत्यक्ष प्रत्यक्ष सहभागातून पालकांना दाखविणे.
३) पालकांचा मुलांच्या विकासातील सहभाग हा जाणता सहभाग करणे.
हिरकणी प्रकल्प स्वरूप
- हिरकणी म्हणजे काय हे समजून घेण्यासाठी मेळावा
- अभ्यासक्रमानुसार( प्रत्यक्ष सत्र )६ दिवस,प्रत्येकी ३ तास
- समारोप मेळावा
- असे ४ महिन्यात ८ दिवस गट येईल
- पालिकांनी वही पेन सोबत घेऊन यावे
- यासाठी मातापालिकाने कोणतेही शुल्क नसेल.
- प्रमाणपत्र हवे असेल तर नोंदणीसाठी ५०/- रुपये भरावे लागेल
- शिक्षणाची अट नाही पण किमान लिहिता वाचता येणे अपेक्षित आहे
- माता असणे आवश्यक,लग्न झालेल्या वय वर्ष २० ते ३२ वयोगटातील महिलाना प्राधान्य.