हे वीर विवेकानंद

हे वीर विवेकानंद हिंदुयशमूर्ती 
हे युवकप्रवर तू युवहृदयांची स्फूर्ती ॥ ध्रु. ॥

दास्यात पाहनी विश्वधर्मजननी ही
तू क्षुब्ध सिंहसा व्याकुळ अंतर्यामी
मुक्तीचा तिचिया ध्यास तुला दिनराती ॥ १ ॥

शत आघातांनी कुंठित मूर्छित झाली
ती हिंदुचेतना फिरून तू चेतविली
तिज उन्नत मस्तक निर्भय केले जगती ॥ २ ॥

स्मरतात तुझे ते घनगर्जितसे शब्द
'मन वज्र हवे अन् मनगट ते पोलाद
जग जिंकायाची ईर्ष्या दाटो चित्ती ॥ ३ ॥

तव अमृतवाणी हाक देत आम्हाते
रे अतुल बलस्वी करू हिंदुराष्ट्राते
युवशक्ति हवी मज कार्यशरण पुरुषार्थी ॥ ४ ॥

जी जीवनपुष्पे सतेज नव रक्ताची
स्थापावा त्यांनी धर्म आत्म अर्पूनी
त्यानेच अर्चना होत राष्ट्रदेवाची ॥ ५ ॥

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *