आरोग्य सखी प्रकल्प
दि.१ जानेवारी २०१९ पासून आरोग्य सखी प्रकल्पाचे काम वेल्हे तालुक्यातील ५० गावांमध्ये बजाज फिनसर्व्ह कंपनीच्या आर्थिक सहाय्यातून सुरु झाला. गेली अनेक वर्षे बचत गटाच्या माध्यमातून या परिसरातील महिलांचे जीवन आपण जवळून पहात आहोत. यातूनच या महिलांमध्ये आरोग्य विषयक जाणीव जागृती व्हावी व त्यांना भेडसावणा-या आरोग्याच्या तक्रारींवर वैद्यकीय उपचार करून घेण्यासाठी त्यांची मानसिक तयारी व्हावी या हेतूने या प्रकल्पाची आखणी झाली. या प्रकल्पांमध्ये ७ प्रकारची आरोग्यविषयक जाणीव जागृती सत्रे व ५ प्रकारच्या आरोग्य तपासण्यांचा समावेश होतो. ते पुढील प्रमाणे-
जाणीव जागृती सत्रे– आरोग्य तपासण्या
१, मासिक पाळी संदर्भात माहिती १. डोळे तपासणी
२. स्त्री आरोग्यविषयक माहिती २. गर्भाशयाचा कर्करोग तपासणी
३. जंत संसर्ग व निर्मुलन ३. गरोदर माता तपासणी
४. सकस आहार ४. दात तपासणी
५. तंबाखू मुक्ती ५. हिमोग्लोबिन तपासणी
६. मानसिक आरोग्य ६. बाल आरोग्य तपासणी व लसीकरण
७. ओळख स्पर्शाची
जानेवारी २०१९ ते मार्च २०२० या कालावधीत स्त्री आरोग्यातील महत्वाच्या विषयांची अशी एकूण ३६६ जाणीवजागृती सत्रे घेण्यात आली व ८५०४ लोकांना याचा प्रत्यक्ष फायदा झाला. चालू वर्षामध्ये वेल्हे तालुक्यातील ८० गावांमधील लोकांसाठी हा प्रकल्प चालू आहे.
Stree Shakti Prabodhan (Rural)-
- A series of constructive activities that began with the organisation of the rural women power through the anti-liquor campaign in Shivaganga- Gunjawani river valleys of Pune district.
- A network of 282 Self-Help Groups (SHGs) of 4000 women across 40 villages.
- Guidence to the rural women through establishment of a local body called ‘Jijamata Prabodhan Kendra’.
- Training of 125 Anganwadi workers for quality improvement in child development
- Health projects and training of health workers(Aarogya Prabodhika) for the health of rural mothers and babies in 25 villages.
- Noteworthy contribution along with government administration in making the Velhe Taluka free from malnutrition.
- Personality development, health, self-employment and leadership training programmes for rural women across all age groups through these various projects.