उपासनेतून प्रेरणा आणि प्रतिभा

. . . .  प्रबोधिनीच्या कामाला आत्तापर्यंत जे काही यश मिळालं त्याचं रहस्य दैनंदिन उपासनेत आहे. प्रबोधिनीचं आत्ताचं यश हाही अनेकांना चमत्कार वाटतो. हा सारा चमत्कार उपासनेतून घडला. नित्य उपासनेतून नवनवीन सुचत गेलं, ते प्रत्यक्षात आणण्याचा निश्चय पक्का होत गेला. प्रेरणेमुळे प्रतिभापूर्ण कार्यचिंतन, कार्यविस्तार, कार्यप्रशासन हे घडत गेलं.

. . . . उपासनेने विचारांना टोक आलं, दिशा मिळाली. ही उपासना आता सुटलेल्या धाग्यांना सुईप्रमाणे जोडण्याचं, विणण्याचं काम करीत आहे. असमाधानातून प्रेरणेची जोपासना झाली, उपासनेतून आत्मपरीक्षणाची सवय लागली.

…….आपल्याच कामाचं चिकित्सक पण विधायक आणि सर्जनशील परीक्षण करता यायला हवं. त्यासाठी वारंवार आत्मचिंतन हवं. या  आत्मचिंतनाने प्रतिभेचं जागरण होत जातं.

       ……..काम करताना आशा-निराशेचे तरंग उठतात,उत्साह-निरुत्साह यांची आंदोलनं होतात. ………… प्रारंभीच्या काळात चढउतार असतातच, पण या चढ-उतारांच्या पलीकडे जाऊन बुद्धीला प्रेरित केलं तर प्रतिभेला कधी खळ पडत नाही. हे सारं उपासनेतून घडू शकतं.

                                                                                                         –  डॉ. वि. वि. पेंडसे

                                                                                                         ‌‘राष्ट्रदेवो भव‌’ (पान १२, १३)